Chocolate Face Pack Benefits: पार्लरमध्ये चॉकलेट वॅक्सिंग तर तुम्ही अनेकदा केले असेल. पण तुम्ही कधी घरी चॉकलेट फेस पॅक ट्राय केला आहे का? नसेल तर आजपासून सुरुवात करा. काही दिवसांत चेहऱ्याचा रंग सुधारण्यासोबतच त्वचेत घट्टपणा दिसून येईल. तसेच मुरुम दूर होतील आणि त्वचा आतून स्वच्छ होईल. जर त्वचेवर मुरुमांचे डाग राहिले तर चॉकलेट फेस पॅक हे डाग देखील दूर करण्यास मदत करते. घरी चॉकलेट फेस पॅक कसा बनवायचा आणि त्याचे फायदे येथे जाणून घ्या.
- चॉकलेट फेस पॅक बनवण्यासाठी एक चमचा कोको पावडर घ्या.
- यात पिकलेली केळी मॅश करून मिक्स करा.
- आता यात वितळलेले डार्क चॉकलेट मिक्स करा.
- आता या सर्व गोष्टी नीट एकत्र मिक्स करून पेस्ट तयार करा.
- ही तयार केलेली चॉकलेटची पेस्ट चेहऱ्यापासून गळ्यापर्यंत लावा.
- हे साधारण अर्धा तास राहू द्या.
- त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
- आठवड्यातून दोनदा चॉकलेट फेसपॅक लावल्याने त्वचेवर अप्रतिम चमक येते.
- ज्या लोकांची त्वचा नेहमी कोरडी असते, त्यांच्यासाठी चॉकलेट फेस पॅक उत्तम आहे. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होतो.
- अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्यामुळे चॉकलेट फेस पॅक चेहऱ्यावरील डाग दूर करण्यास मदत करतो.
- जर त्वचा रुक्ष राहिली आणि कोमलता दिसत नसेल तर चॉकलेट फेस पॅक त्वचा मुलायम होण्यास मदत करते.
- चॉकलेट फेस पॅकमुळे मृत त्वचा मऊ पद्धतीने काढून टाकण्यास मदत होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या