Chocolate Day Wishes and Messages: जगभरात ७ जुलै रोजी जागतिक चॉकलेट दिवस (world chocolate day) साजरा केला जातो. या खास दिवशी लोक आपल्या कुटुंबियांना आणि मित्रांना चॉकलेट खाऊ घालतात आणि त्यांचे तोंड गोड करतात. चॉकलेट सोबतच तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुंदर मेसेज द्वारे चॉकलेट डेच्या शुभेच्छा देऊ शकतात. हे शुभेच्छा संदेश त्यांच्या चेहऱ्यावर गोड हसू आणतील. आपल्या प्रियजनांना चॉकलेट डेच्या शुभेच्छा देण्यासाठी हे संदेश पाठवायला विसरू नका.
नातं चॉकलेट सारखं असावं
कितीही भांडण झालं तरी
एकमेकांमध्ये कायम गोडवा ठेवणारं
हॅपी चॉकलेट डे!
गोड आनंद आणि गोड आठवणींमध्ये मग्न होऊन
हा चॉकलेट डे साजरा करूया
Happy Chocolate Day!
किटकॅटचा स्वाद आहेस तू
डेअरी मिल्कसारखी स्वीट आहेस तू
कॅडबरीपेक्षाही खास आहेस तू
काहीही असो माझी फाईव्ह स्टार आहेस तू
हॅपी चॉकलेट डे!
गोड व्यक्तीसारखी नेहमी जवळ रहा
आयुष्याचे मधुर गीत गात रहा
नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी
चॉकलेट डेच्या शुभेच्छा स्वीकार करा
Happy Chocolate Day!
गोड व्यक्तीसारखी तू नेहमी माझ्या जवळ रहा
आयुष्यात साथ दे अशी की आजन्म मधूर गाणे गात रहा
कधी होतील चुका माझ्याकडून किंवा तुझ्याकडूनही
तरीही आयुष्यभर चॉकलेट सारखी माझ्यापाशीच रहा
हॅपी चॉकलेट डे!
मन माझं चॉकलेट सारखं सॉफ्ट
त्यात नखरा तुझा ड्रायफ्रूटचा
आयुष्य होईल माझं फ्रूट अँड नट सारखं
जेव्हा देशीर माझ्या हाती हात तुझा
Happy Chocolate Day!
आयुष्य हा सर्वात सुंदर उत्सव आहे
हा उत्सव चॉकलेटशिवाय अपूर्ण आहे
चॉकलेटसह जीवनाचा आनंद घेऊया
चॉकलेट डेच्या सर्वांना शुभेच्छा देऊया
हॅपी चॉकलेट डे!