Hot Chocolate Drink Recipe: लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडते. चॉकलेट पासून कितीतरी प्रकारचे पदार्थ बनवले जातात. पण तुम्हाला माहीत आहे का तुमच्या आवडत्या चॉकलेटचा सुद्धा खास दिवस असतो. होय, दरवर्षी ७ जुलै रोजी जागतिक चॉकलेट दिवस (world chocolate day) साजरा केला जातो. तुम्हाला तुमचा हा दिवस आणखी खास बनवायचा असेल तर तुम्ही घरच्या घरी हॉट चॉकलेट बनवू शकता. हॉट चॉकलेट ड्रिंक झटपट आणि मिनिटात तयार होते. ते प्यायल्याने तुमचा दिवस दिवस नक्कीच खास होईल. चला तर वाट कसली पाहताय जाणून घ्या कसे बनवायचे हॉट चॉकलेट ड्रिंक.
- ५० ग्रॅम चॉकलेट
- दोन कप फुल क्रीम मिल्क
- दोन चमचे साखर
- एक चमचा चॉकलेट सिरप
- एक चमचा व्हॅनिला इसेन्स
हॉट चॉकलेट ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम चॉकलेट घेऊन त्याचे छोटे तुकडे करा. ते एका बाऊलमध्ये काढा आमि त्याला खोलीच्या तापमानावर थोडा वेळ राहू द्या. जेणेकरून ते मऊ होऊन लवकर वितळते. आता एका पॅनमध्ये दोन कप दूध गरम करा. दुधाला उकळी आल्यावर त्यात साखर आणि चॉकलेट सिरप घाला. तुमच्या आवडीनुसार त्याचा गोडवा अॅडजस्ट करा. साखर आणि सिरप चांगले वितळल्यावर पॅन गॅसवरून खाली उतरवून घ्या. आता चॉकलेटच्या भांड्यात दोन ते तीन चमचे कोमट दूध घाला. जेणेकरून सर्व चॉकलेट वितळेल. चॉकलेट आणि दूध चांगले मिक्स करा. आता हे चांगले वितळवून गरम दुधात चॉकलेट मिक्स करा.
सोबत एक चमचा व्हॅनिला इसेन्स घाला. आता हे मगमध्ये किंवा कपमध्ये टाका. तुम्हाला हवं असेल तर त्यावर थोडं व्हिप्ड क्रीम सुद्धा घालू शकता. तुमचा हॉट चॉकलेट ड्रिंक तयार आहे. गरमा गरम सर्व्ह करा.