Prevention for Rare Cancers in India: जगभरात दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. जागतिक कर्करोग दिन (world cancer day) साजरा करण्यामागचा उद्देश कर्करोगासारख्या घातक आजाराबाबत लोकांना जागरूक करणे हा आहे. कर्करोगाचा सामाजिक आणि आर्थिक प्रभाव विशेषतः विकसनशील देशांमध्ये जास्त दिसतो. भारताची लोकसंख्या १.३ अब्ज झाली आहे आणि जगाच्या लोकसंख्येच्या १८ टक्के लोकसंख्या भारतात आहे. भारतासारख्या विकसनशील देशात कर्करोगाने आपले पाय चांगलेच पसरवले आहेत. डॉक्टरांच्या मते पुढील दशकात भारतात सुमारे १० मिलियन लोक कर्करोगाचे शिकार होतील. बऱ्याच लोकांना आतापर्यंत स्तनाचा कर्करोग, लिव्हर, ओरल कॅव्हिटी, पोट आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाबद्दल माहिती आहे. हे कर्करोगाचे सामान्य प्रकार आहेत. परंतु दुर्मिळ कर्करोगाबद्दल (rare cancer) तुम्ही कधी ऐकले आहे का? नाही तर जाणून घ्या सविस्तर.
दुर्मिळ कर्करोग किंवा रेअर कॅन्सर त्यांना म्हणतात जे एक लाख लोकसंख्येतील ६ लोकांना प्रभावित करतात, असे नोएडा येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. जलज बक्षी यांनी सांगितले. उत्तम निदान तंत्रे आणि अधिक प्रगत उपचार मार्गदर्शक तत्त्वांमुळे कर्करोगाचे निदान वर्षानुवर्षे सुधारत असले तरी, दुर्मिळ कर्करोगाची परिस्थिती अजूनही गंभीर आहे. ज्याचे कारण रोग उशीरा ओळखणे हे आहे. दुर्मिळ कर्करोगाची लक्षणे तेव्हाच दिसतात जेव्हा ते अत्यंत प्रगत अवस्थेत पोहोचतात. याशिवाय त्यांच्या उपचारांशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वेही सध्या स्पष्ट नाहीत. उपचाराचा खर्च आणि विमा संरक्षणाचा अभाव यामुळे कर्करोगाच्या उपचारातील आव्हाने आणखी वाढतात. अशा परिस्थितीत भारतात आढळणाऱ्या या खालील प्रकारच्या दुर्मिळ कर्करोगांबद्दल जागरूक राहण्याची गरज आहे.
मेलेनोमा हा त्वचेचा कर्करोगाचा एक अतिशय आक्रमक प्रकार आहे, जो नोड्सद्वारे शरीराच्या इतर भागांमध्ये पसरतो. हे पिग्मेंटेड असते आणि शरीराच्या शेवटी आणि म्युकोक्युटॅनस दिसते. आजार कोणत्या टप्प्यावर आहे त्यानुसार शस्त्रक्रिया आणि केमो-इम्युनोथेरपीद्वारे उपचार केले जातात.
स्वादुपिंड हा आपल्या पोटाच्या आतील भागात स्थित एक अवयव आहे, जो पेटोबिलरी प्रणालीशी जोडलेला असतो. स्वादुपिंडाचा कर्करोग अनेकदा प्रगत अवस्थेत आढळतो. त्याची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात दिसून येत नाहीत. हा आजार गंभीर झाल्यानंतर काही प्रमाणात काविळीच्या स्वरूपात हा आजार जाणवतो. काही रुग्णांचे लवकर निदान होते आणि त्यांच्यावर शस्त्रक्रियेने उपचार केले जातात. तर केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी एडव्हान्स स्वादुपिंडाच्या कर्करोगावर उपचार करण्यासाठी वापरली जातात.
हे ट्यूमर सामान्यत: मेसेन्कायमल टिश्यूवर (हाडे, स्नायू, टेंडन आणि फॅसिआ) प्रभावित करतात आणि बहुतेकदा शरीराच्या शेवटी आणि रेट्रोपेरिटोनियममध्ये आढळतात. त्यांच्या उपचारासाठी शस्त्रक्रिया रेडिएशन थेरपी आणि केमोथेरपी वापरली जाते. अलिकडच्या वर्षांत अनेक रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करून अवयव वाचवण्याची शक्यता (लिंब सॅल्वेज) वाढली आहे.
हे मायलोप्रोलिफेरेटिव्ह डिसऑर्डर असते आणि त्यात मान, बगल आणि ओटीपोटात लिम्फ नोड्स वाढतात. हे केमोथेरपीद्वारे उपचार केले जाते, जे खूप प्रभावी आहे. परंतु हा रोग अनेकदा पुन्हा होतो आणि नंतर अस्थिमज्जा प्रत्यारोपणाने उपचार केला जातो.
हा स्टर्नम हाडाच्या मागे वक्षस्थळामध्ये (थौरेक्स) स्थित थायमस ग्रंथीचा कर्करोग आहे. इमेजिंग आणि बायोप्सीच्या मदतीने याचे निदान केले जाते. जर हा आजार सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर तो शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकला जाऊ शकतो. तर जेव्हा तो प्रगत अवस्थेत पोहोचतो तेव्हा केमोरेडिएशनची मदत घेतली जाते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)