World Cancer Day 2025 : भारतात कर्करोगाने पिडीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी किंवा निदान झाल्यास त्याचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी सक्रिय पाऊल उचलणे गरजेचे आहे. कर्करोग म्हणजे जेव्हा तुमच्या शरीरातील असामान्य पेशी ज्या अनियंत्रितपणे वाढू लागतात. जवळजवळ १०० प्रकारचे कर्करोग आहेत, जे तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम करतात आणि त्यांना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. कर्करोगाबद्दल माहिती आणि जागरूकतेमुळे सुरुवातीच्या टप्प्यात कर्करोगाचे निदान होण्यास मदत होते आणि त्याचबरोबर जीवनाची गुणवत्ता सुधारते. आपल्या शरीरातील ही असामान्यता वेळीच शोधण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे महत्त्वाचे ठरू शकते, असे रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अमोल पवार म्हणतात.
> मला कोणत्या प्रकारचा कर्करोग झाला आहे आणि तो किती प्रगत अवस्थेत आहे?
तुम्हाला कोणत्या प्रकारचा कर्करोग झाला आहे आणि कोणत्या टप्प्यावर आहे हे समजून घेतल्याने आणि जाणून घेतल्याने तुम्हाला तुमच्या स्थितीबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यास मदत होऊ शकते. तुमचा कर्करोगाचा प्रकार आणि टप्पा हे ठरवेल की, तुमचे डॉक्टर कोणत्या प्रकारच्या कर्करोगाच्या उपचारांची शिफारस करू शकतात.
> कोणते उपचार पर्याय उपलब्ध आहेत?
डॉक्टर केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपीसह शस्त्रक्रियेचा सल्ला देऊ शकतात, जी कर्करोगाचा सामना करण्यासाठी उपचारांपैकी एक आहे. आता, रुग्णाला इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपीचा देखील सल्ला देखील दिला जाऊ शकतो. यशस्वी परिणामांसाठी डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्याचे पालन करणे अत्यावश्यक आहे.
> उपचारादरम्यान मला बरे वाटण्यास जीवनशैलीत कोणते बदल करावे?
तुमच्या दैनंदिन दिनचर्येत छोटे बदल केल्याने तुम्हाला बरे वाटण्यास मदत होऊ शकते. यामध्ये तणावाचे व्यवस्थापन करणे, निरोगी आहाराच्या सवयी स्वीकारणे किंवा नियमितपणे सौम्य व्यायाम करणे यासारखे बदल समाविष्ट असू शकतात.
> उपचारानंतर पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे का?
पुनरावृत्तीची शक्यता टाळण्यासाठी, डॉक्टरांकडे नियमित तपासणी आणि फॉलो-अप करा. शरीरात होणारे कोणतेही असामान्य बदल, लक्षणे आढळल्यास विलंब न करता वैद्यकिय सल्ला घ्या.
> काही सपोर्ट ग्रूप आहेत ते उपयुक्त ठरू शकतात का?
सपोर्ट ग्रूप्स हे रुग्णांना भावनिक आधार देतात आणि रुग्ण इतरांच्या अनुभवांमधून शिकू शकतात. कर्करोगाशी लढण्यासाठी आणि त्यावर यशस्वीरित्या मात करण्यासाठी आणि स्वतःला सक्षम करण्यासाठी सपोर्ट ग्रुपची मदत घेणे गरजेचे आहे.
संबंधित बातम्या