World Cancer Day : कर्करोगाचे किती प्रकार आहेत? त्याची कारणे आणि लक्षणे काय? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Cancer Day : कर्करोगाचे किती प्रकार आहेत? त्याची कारणे आणि लक्षणे काय? जाणून घ्या

World Cancer Day : कर्करोगाचे किती प्रकार आहेत? त्याची कारणे आणि लक्षणे काय? जाणून घ्या

Feb 03, 2025 01:32 PM IST

World Cancer Day 2025 : कर्करोगाच्या बाबतीत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत आणि यामुळे अनेक लोक उपचार घेण्यास कचरतात.

कर्करोगाचे किती प्रकार आहेत? त्याची कारणे आणि लक्षणे काय? जाणून घ्या
कर्करोगाचे किती प्रकार आहेत? त्याची कारणे आणि लक्षणे काय? जाणून घ्या

Types Of Cancer : आजच्या युगात कर्करोग अर्थात कॅन्सर हा एक सामान्य आजार बनला आहे. कर्करोगाचे अनेक प्रकार असू शकतात आणि आजच्या आधुनिक उपचार पद्धतींमुळे त्यावर उपचार करणे शक्य झाले आहे. तथापि, कर्करोगाच्या बाबतीत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत आणि यामुळे अनेक लोक उपचार घेण्यास कचरतात. त्यामुळे, कर्करोगाबाबत माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यावर योग्य उपचार केले जाऊ शकतील. लोकांमध्ये या आजाराविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक कर्करोग दिन' म्हणून पाळला जातो.

कर्करोगाचे किती प्रकार आहेत?

कर्करोगाचे अनेक प्रकार असू शकतात. शरीरातील प्रत्येक अवयवावर कर्करोगाचा प्रभाव होऊ शकतो. पुरुष आणि स्त्रियांमध्ये कर्करोगाचे वेगवेगळे प्रकार आढळतात. पुरुषांमध्ये मुख्यतः तंबाखू, धूम्रपान आणि मद्यपानाशी संबंधित कर्करोगांचा धोका जास्त असतो. यामध्ये फुफ्फुसाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, कोलोरेक्टल कर्करोग आणि यकृताचा कर्करोग समाविष्ट आहे. तर, महिलांमध्ये, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि कोलोरेक्टल कर्करोगाचे प्रमाण जास्त असते. विशेषत: जास्त वजन असलेल्या महिलांना कोलोरेक्टल कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते.

काय आहेत कर्करोगाची लक्षणे?

कर्करोगाचे लक्षणे प्रत्येक प्रकारानुसार वेगवेगळी असतात. फुफ्फुसाच्या कर्करोगामध्ये वारंवार खोकला, खोकल्यामुळे रक्त येणे, आणि श्वास घेण्यात अडचण यासारखी लक्षणे दिसतात. तोंडाच्या कर्करोगात, तोंडात व्रण किंवा फोड असणे, ज्यामुळे बरे होणे अवघड होते, हे एक प्रमुख लक्षण आहे. कोलोरेक्टल कर्करोगाच्या लक्षणांमध्ये शौचाशी संबंधित समस्या, वजन कामी होणे, अशक्तपणा आणि रक्ताची कमी होणे यांचा समावेश होतो. स्तनाच्या कर्करोगामध्ये गुठळ्या दिसणे, ही एक महत्त्वाचे लक्षण आहे.

Cancer Awareness : औषधांसोबत आपल्या माणसाची काळजीही आवश्यक ! 'मेटास्टॅटिक ब्रेस्ट कॅन्सर'शी कसे कराल दोन हात?

कर्करोगाची लक्षणे सुरुवातीच्या अवस्थेत दिसल्यास त्यावर योग्य उपचार मिळवणे खूप महत्त्वाचे आहे. डॉक्टरांकडून लवकरात लवकर निदान करणे आणि उपचार सुरू करणे, यातून लवकर बारे होण्यास मदत करू शकते. कर्करोगाची योग्य माहिती न मिळाल्यामुळे लोक वेळेवर उपचार घेत नाहीत, परिणामी आजार गंभीर होतो. आधुनिक तंत्रज्ञानामुळे कर्करोगाच्या उपचारांमध्ये मोठे बदल झाले आहेत. त्यात रोबोटिक शस्त्रक्रिया हा एक अत्याधुनिक उपचार पद्धत आहे, जी कर्करोगाच्या उपचारांमध्ये अत्यंत उपयुक्त ठरली आहे.

काय आहेत उपचार?

कर्करोगाच्या उपचारासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामध्ये शस्त्रक्रिया, किमोथेरपी, रेडिएशन थेरपी यांचा समावेश होतो. प्रत्येक रुग्णाच्या प्रकारानुसार उपचार पद्धती ठरवली जातात. यामुळे, आजच्या काळात कर्करोगावर उपचार करणे शक्य असून, लवकर निदान होणाऱ्या रुग्णांना याचा चांगला फायदा होतो. अशा परिस्थितीत, कर्करोगाच्या लक्षणांची माहिती असणे, वेळेवर तपासणी करणे आणि योग्य उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणत्याही प्रकारचा कर्करोग असलेले रुग्ण त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावरील योग्य उपचार घेऊ शकतात.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner