Foods To Boost Brain Health: आपला मेंदू वयानुसार कार्यक्षमतेने कार्य करत नसल्याची चिंता वाटते? अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्या हातात नसतात, परंतु या महत्त्वपूर्ण अवयवाला योग्य पोषण मिळेल याची खात्री केल्यास त्याचे कार्य बऱ्याच प्रमाणात सुधारण्यास मदत होते. हृदय आणि फुफ्फुसांच्या योग्य कार्यासह मेंदू आपल्या शरीरातील काही महत्वाची कार्ये कशी करतो हे आपल्या सर्वांना माहित आहे. महत्त्वाच्या मानसिक कामांमध्ये मदत करण्यापासून ते स्मरणशक्ती, स्पर्श, भावना यासारख्या मूलभूत कार्यांवर नियंत्रण ठेवण्यापर्यंत, आपल्या मेंदूचे आरोग्य खरोखरच आपल्या सर्वांगीण आरोग्याचा पाया आहे.
"मेंदूच्या आरोग्यावर आहाराचा होणाऱ्या परिणामावरील अभ्यासानुसार, असे आढळले आहे की ओमेगा ३ फॅटी अॅसिडसमृद्ध असलेले पदार्थ व्यक्तीच्या संज्ञानात्मक प्रक्रियेस समर्थन देतात, तर सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाणे जास्त असलेला आहार संज्ञानात्मक प्रक्रियेस समर्थन देणारे आण्विक सबस्ट्रेट्स कमी करण्यासाठी आणि न्यूरोलॉजिकल डिसफंक्शनचा धोका वाढविण्यासाठी कुप्रसिद्ध होत आहेत, असे कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलच्या क्लिनिकल डायटीशियन श्वेता महाडिक सांगतात. आपल्या मेंदूच्या आरोग्यास चालना देण्यासाठी आणि वृद्धापकाळापर्यंत सक्रिय व रोगमुक्त राहण्यासाठी आपल्या आहारात या ५ पदार्थांचा समावेश केला पाहिजे.
व्हिटॅमिन ई, के आणि इतर असंख्य आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेल्या पालेभाज्या संज्ञानात्मक घट रोखण्यास मदत करतात. ते सकारात्मक मूड राखण्याव्यतिरिक्त झोपेची गुणवत्ता सुधारण्यास देखील मदत करतात. अशी आश्चर्यकारक फायदे देणारे काळे, पालक, कोलार्ड ग्रीन्स आणि ब्रोकोली खाणे आवश्यक आहे.
बऱ्याच संशोधन संस्थांनी हे सिद्ध केले आहे की नटचे सेवन हृदयाच्या आरोग्याचे आणि मेंदूचे आरोग्य सुधारू शकते. नट्समध्ये अँटीऑक्सिडेंट्स, हेल्दी फॅट आणि व्हिटॅमिन ई सह विविध पोषक घटक असल्याने ते कोणत्याही आहारात एक चांगली भर घालतात. कारण ते कमीत कमी कॅलरीसह उर्जा प्रदान करतात. हे स्नॅक आयटम म्हणूनही ते उत्तम आहेत.
एक लोकप्रिय ब्रेकफास्ट फूड असलेल्या अंड्यांमध्ये प्रथिने मूल्य खूप जास्त असते. म्हणूनच ते आपल्या आरोग्यासाठी परिपूर्ण असतात. ते खूप परवडणारे आहेत आणि विविध प्रकारे शिजवले जाऊ शकते. असे म्हटले गेले आहे की अंडी प्रौढांमध्ये संज्ञानात्मक कार्यक्षमता सुधारू शकतात आणि कोलीनचा एक चांगला स्त्रोत आहे, जो जळजळ कमी करण्यासाठी आणि मेंदूच्या कार्यास प्रोत्साहित करण्यासाठी उपयुक्त आहे. जसे की स्मृती आणि मेंदूच्या पेशींमध्ये कम्युनिकेशन राखणे.
उच्च अँटीऑक्सिडेंट कोशंटसह, बेरी रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास आणि फ्री रॅडिकल नुकसानीमुळे होणाऱ्या जळजळीचा सामना करण्यास मदत करतात. बेरीमध्ये अँथोसायनिन्स आणि पॉलीफेनॉल असल्याने ते नैराश्य आणि चिंतेशी संबंधित लक्षणे सुधारण्यासाठी देखील प्रभावी आहेत. ते शॉर्ट टर्म मेमरी लॉस होण्यास विलंब करण्यास देखील मदत करतात, म्हणूनच ज्यांना दीर्घकाळ मेंदूच्या चांगल्या आरोग्याचा आनंद घ्यायचा आहे त्यांच्या आहारात ब्लॅकबेरी, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि रास्पबेरी सारख्या विविध प्रकारच्या बेरींचा समावेश केला पाहिजे.
मेंदूच्या योग्य कार्यासाठी आवश्यक असणारे फॅटी अॅसिड ऑइली फिशमध्ये चांगल्या प्रतीचे आढळतात. ओमेगा ३ फॅट्स माशांमध्ये इकोसापेंटेनोइक अॅसिड (ईपीए) आणि डोकोसाहेक्झेनोइक अॅसिड (डीएचए) च्या स्वरूपात आढळतात, जे स्मृती सुधारण्यासाठी उपयुक्त मानले जातात. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे डीएचएची पातळी कमी असते तेव्हा यामुळे एमेंटिया आणि अल्झायमर सारख्या मेंदूचे आजार होऊ शकतात. याव्यतिरिक्त, आहारात सॅल्मन आणि ट्यूना सारख्या ऑइली माशांचा समावेश केल्याने तणाव व्यवस्थापित करण्यास, मूड वाढण्यास आणि मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या विकासास मदत होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या