मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Blood Donation Benefits: या कारणांमुळे केले पाहिजे रक्तदान, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Blood Donation Benefits: या कारणांमुळे केले पाहिजे रक्तदान, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Jun 14, 2024 01:35 PM IST

World Blood Donor Day 2024: हृदयाचे आरोग्य सुधारण्यापासून ते नवीन रक्तपेशींचे उत्पादन वाढविण्यापर्यंत नियमितपणे रक्तदान करण्याची काही कारणं जाणून घ्या.

रक्तदान करण्याचे फायदे
रक्तदान करण्याचे फायदे

Health Benefits of Blood Donation: रक्तदान करणे हे फक्त एक महान कार्य नाही तर रक्तदान केल्यामुळे अनेक आरोग्य फायदे देखील मिळतात. रक्त संक्रमण हे अॅनिमिया, कॅन्सर अशा अनेक आरोग्यविषयक विकारांवर उपचार करण्यासाठी केले जाते. हेल्थ केअर इंडस्ट्रीसाठी रक्ताचा अखंड पुरवठा होण्यास मदत होत असल्याने लोकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले जाते. रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि रुग्णांच्या उपचारात याची कशी मदत होते, हे पटवून देण्यासाठी दरवर्षी १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. तथापि रक्तदान करणे हा दुहेरी फायदा देतो. हे रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला तसेच ते प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला असे दोघांना मदत करते.

रक्तदानाचे आश्चर्यकारक आरोग्य फायदे

हृदयाचे आरोग्य सुधारते

रक्तदान केल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास चालना मिळते. हे रक्तातील स्निग्धता कमी करते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होण्यास मदत होते. रक्तदानामुळे रक्ताचा प्रवाह निरोगी राहण्यास मदत होते, ज्यामुळे हृदयावरील ताण कमी होतो.

ट्रेंडिंग न्यूज

लोहचे साठे कमी करते

रक्तातील जास्त लोहामुळे हेमोक्रोमॅटोसिस होऊ शकतो. ही अशी स्थिती आहे ज्यामुळे हृदय आणि यकृत यासारख्या अवयवांचे नुकसान होऊ शकते. जेव्हा आपण नियमितपणे रक्तदान करतो तेव्हा अतिरिक्त लोह कमी होते, जे संपूर्ण आरोग्यास हातभार लावते.

नवीन रक्तपेशींची निर्मिती

रक्तदान केल्यानंतर शरीर रक्ताची कमतरता भरून काढण्याचे काम करते. यामुळे नवीन रक्तपेशी तयार होण्यास मदत होते. शरीराची नवीन पेशी तयार करण्याची आणि कार्ये प्रभावीपणे करण्याची क्षमता वाढण्यास मदत होते.

मोफत आरोग्य तपासणी

रक्तदान करण्यापूर्वी पल्स, रक्तदाब, शरीराचे तापमान आणि हिमोग्लोबिनची पातळी यासह बेसिक हेल्थ चेकअप करणे बंधनकारक आहे. हे आपल्याला आपल्या शरीराबद्दल अधिक जागरूक होण्यास आणि आरोग्याच्या कोणत्याही समस्येचे निराकरण करण्यास मदत करू शकते.

मानसिक आरोग्य सुधारते

आपण दान केलेले रक्त एखाद्याचे जीव वाचवू शकते किंवा एखाद्या गंभीर परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला मदत करू शकते हे जाणून घेतल्यास आपल्याला मानसिक उत्तेजन, मानसिक समाधान मिळते आणि आपल्याला बरे वाटते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel