World Blood Donor Day 2024: का साजरा केला जातो जागतिक रक्तदाता दिन? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Blood Donor Day 2024: का साजरा केला जातो जागतिक रक्तदाता दिन? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

World Blood Donor Day 2024: का साजरा केला जातो जागतिक रक्तदाता दिन? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Published Jun 14, 2024 09:54 AM IST

World Blood Donor Day 2024: दरवर्षी १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा इतिहास आणि त्याचे महत्त्व जाणून घ्या.

जागतिक रक्तदाता दिन
जागतिक रक्तदाता दिन (Photo by Nguyễn Hiệp on Unsplash)

World Blood Donor Day History and Significance: रक्तदान हे एक महान कार्य आहे. रक्ताची कमतरता, अॅनिमिया आणि कर्करोग यासारख्या विविध वैद्यकीय परिस्थितींवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो. रक्तदानाच्या प्रक्रियेत सहसा एखादी व्यक्ती रक्तपेढीला किंवा रक्तसंक्रमणासाठी रक्त गोळा करणाऱ्या संस्थेला रक्तदान करते. हेल्थ केअर इंडस्ट्रीसाठी निरोगी रक्ताच्या सतत पुरवठ्यासाठी रक्तदान हे एक महत्त्वाचे कार्य आहे. रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यासाठी दरवर्षी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. दरवर्षी १४ जून रोजी जागतिक रक्तदाता दिन साजरा केला जातो. हा खास दिवस साजरा करताना या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेण्यासोबतच काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

जागतिक रक्तदाता दिनाचा इतिहास

१९४० मध्ये रिचर्ड लोअर नावाच्या शास्त्रज्ञाने कोणतेही दुष्परिणाम न होता दोन कुत्र्यांमध्ये रक्त संक्रमण केले. या यशामुळे आधुनिक रक्त संक्रमण तंत्राचा विकास होऊ शकला आणि आरोग्य सेवा क्षेत्रात रक्तदान आणि संक्रमण ही नियमित प्रक्रिया बनली. २००५ मध्ये जागतिक आरोग्य सभेने १४ जून हा दिवस जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक रक्तदाता दिनाचे महत्व आणि २०२४ ची थीम

यंदाच्या जागतिक रक्तदाता दिनाची थीम - दान साजरी करण्याची २० वर्षे : रक्तदात्यांचे आभार (20 years of celebrating giving: thank you blood donors) अशी आहे. जागतिक रक्तदाता दिन हा रक्तदानाच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढविण्याच्या आणि समुदायांना आधार देण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. आरोग्य सेवा उद्योगासाठी निरोगी रक्ताचा सतत पुरवठा होण्यास मदत करण्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहन देखील या दिवशी केले जाते. जागतिक रक्तदाता दिनाचा २० वा वर्धापनदिन ही जगभरातील रक्तदात्यांचे वर्षानुवर्षे जीवनरक्षक दानाबद्दल आभार मानण्याची आणि रुग्ण आणि दाते दोघांवर झालेल्या खोल परिणामाचा सन्मान करण्याची एक उत्कृष्ट संधी आहे. सततच्या आव्हानांना सामोरे जाण्याची आणि सुरक्षित रक्त संक्रमण सर्वमान्य असलेल्या भविष्याच्या दिशेने प्रगतीला गती देण्याची ही एक योग्य वेळ आहे," असे जागतिक आरोग्य संघटनेने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर लिहिले आहे.

Whats_app_banner