World Bicycle Day History and Significance: दरवर्षी ३ जून रोजी जगभरात जागतिक सायकल दिवस साजरा केला जातो. सायकल चालवण्याच्या हजारो फायद्यांबद्दल जनजागृती वाढवण्याच्या उद्देशाने जागतिक सायकल दिन साजरा केला जातो. जर आपण सायकल चालवण्याच्या फायद्यांबद्दल बोललो तर अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की दररोज अर्धा तास सायकल चालवल्याने व्यक्ती लठ्ठपणा, हृदयविकार, मानसिक आजार, मधुमेह आणि संधिवात यांसारख्या अनेक आजारांपासून सुरक्षित राहू शकते. जागतिक सायकल दिवसाचा मनोरंजन इतिहास आणि महत्त्व जाणून घेण्यासोबतच पाहा २०२४ ची थीम.
१९९० पर्यंत सायकल प्रचलित होती पण बदलत्या काळानुसार त्याचे महत्त्व लोकांमध्ये हळूहळू कमी होत गेले. लोकांना पुन्हा एकदा त्याचे महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी जागतिक सायकल दिन साजरा करण्याचा विचार करण्यात आला. त्यानंतर ३ जून २०१८ रोजी हा दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली. हा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा अमेरिकेतील माँटगोमेरी कॉलेजचे प्रोफेसर लेस्झेक सिबिल्स्की यांनी याचिकेच्या स्वरूपात दिला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्र महासभेने ३ जून हा दिवस जागतिक सायकल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.
पर्यावरण प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सायकल हा उत्तम मार्ग आहे. यामुळे वायू प्रदूषण कमी होते आणि संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. अशा परिस्थितीत जागतिक सायकल दिनाचे महत्त्व समाजातील सर्व लोकांमध्ये सायकलच्या वापरास प्रोत्साहन देणे, शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ करण्यासाठी राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर सायकल चालविण्यास प्रोत्साहन देणे हे आहे.
दरवर्षी जागतिक सायकल दिन साजरा करण्यासाठी एक नवीन थीम ठेवली जाते. २०२४ मधील जागतिक सायकल दिनाची थीम 'सायकल चालवण्याद्वारे चांगले आरोग्य, निष्पक्षता आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन देणे' (Encouraging good health, fairness, and sustainability through cycling) अशी ठेवण्यात आली आहे. ही थीम ठेवण्यामागचा उद्देश सायकलिंगच्या माध्यमातून विकासाच्या उद्दिष्टांना चालना देणे हा आहे.
संबंधित बातम्या