What to Eat and Avoid By Asthma Patient: दरवर्षी मे महिन्याचा पहिला मंगळवार हा जागतिक अस्थमा दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदा हा दिवस ७ मे रोजी साजरा केला जात आहे. हा दिवस अस्थमा किंवा दमा आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. दमा ही श्वसनाची समस्या आहे, ज्यामध्ये व्यक्तीने आपल्या खाण्या- पिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण खाण्या-पिण्यात थोडासा निष्काळजीपणा सुद्धा हा त्रास वाढवू शकतो. दम्याच्या रुग्णांनी त्यांच्या आहारात अशाच गोष्टींचा समावेश करावा, ज्या त्यांच्यासाठी फायदेशीर असतील. या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांनी काय खावे आणि कोणत्या गोष्टी खाणे टाळावे ते येथे जाणून घ्या.
- जर एखाद्या व्यक्तीला दमा सारखी समस्या असेल तर त्याने जंक फूड, तेलकट, पॅकेज्ड आणि कॅन मधील खाद्यपदार्थ खाणे टाळावेत. हे खोकला आणि सूज यांसारखी लक्षणे ट्रिगर करतात.
- याशिवाय तुम्ही कोला, सोडा, केक, पेस्ट्री , कँडी, मिठाई, ज्यूस आणि फ्लेवर्ड पदार्थ खाणे टाळावे. कारण ते खाल्ल्याने तुमची स्थिती बिघडू शकते आणि तुमच्या फुफ्फुसात जळजळ होऊ शकते.
- वाळलेली फळे खाणे टाळा. कारण ते सल्फाइट्सच्या मदतीने प्रिजर्व्ह केले जातात. यामुळे तुमचा दमा वाढू शकतो आणि फुफ्फुसात जळजळ होऊ शकते.
- त्याच वेळी अल्कोहोल, मसालेदार भाज्या आणि बाटलीबंद लिंबाच्या रसामध्ये देखील सल्फाइट असतात, म्हणून त्यांच्यापासून दूर राहणे चांगले.
- दम्याचे रुग्ण बदाम, अक्रोड, पनीर, ताक, दही आणि तूप यासारख्या गोष्टी खाऊ शकतात.
- सफरचंद आणि द्राक्ष या फळांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि सेलेनियम नावाचे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे निसर्गात अँटी इंफ्लेमेटरी असतात.
- दम्याच्या रुग्णांनी ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, शेंगा आणि कडधान्ये पुरेशा प्रमाणात खावीत.
- ओमेगा-३ फॅटी ॲसिड असलेले अन्नपदार्थ दमा असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतात. ते ब्रोकोली, बीटरूट, बटाटे, गाजर, मेथी, कोथिंबीर, स्प्रिंग ओनियन्स म्हणजे हिरवा कांदा, कांदे, लसूण, आले, संत्री, ब्लॅकबेरी, द्राक्षे, नाशपती, डाळिंब, किवी आणि चेरी खाऊ शकतात.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)