World Animal Day: अनेक महिने काहीही न खाता जगतात 'हे' ५ प्राणी, वाचा प्राण्यांविषयी रंजक माहिती
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Animal Day: अनेक महिने काहीही न खाता जगतात 'हे' ५ प्राणी, वाचा प्राण्यांविषयी रंजक माहिती

World Animal Day: अनेक महिने काहीही न खाता जगतात 'हे' ५ प्राणी, वाचा प्राण्यांविषयी रंजक माहिती

Oct 04, 2024 09:24 AM IST

Different animals: आज 'जगातील पशु दीना'च्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्यामध्ये नेमकं काय आहे, ज्यामुळे ते इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहेत.

World Animal Day 2024
World Animal Day 2024 (freepik)

strange animals of the world:  पृथ्वीवर अनेक नैसर्गिक चमत्कार घडत असतात, ज्यापैकी अनेक गोष्टींबद्दल मानव अजूनही अनभिज्ञ आहे. आज आम्ही तुम्हाला अशा काही प्राण्यांबद्दल सांगणार आहोत जे काहीही न खाता कित्येक महिने जगू शकतात, जे ऐकून तुम्हाला एकदा तरी विचार येईल की, ते खरोखरच आपल्या आजूबाजूला राहतात का? तर हे सत्य आहे. आपल्या आजूबाजूला असे काही प्राणी आहेत ज्यांना अनेक दिवस न खाता जगता येते. आज 'जगातील पशु दीना'च्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्यामध्ये नेमकं काय आहे, ज्यामुळे ते इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहेत.

पेंग्विन-

पेंग्विन ज्याठिकाणी राहतात तिथे तापमान इतके कमी असते की त्याची भूक आपोआप कमी होते. अशा परिस्थितीत, ते २ ते ४ महिने काहीही खाल्ल्याशिवाय राहू शकतात. विशेष म्हणजे जेव्हा शून्यापेक्षा कमी तापमानात शिकारीची वेळ येते, तेव्हा नर मुलांना उबदार ठेवण्यासाठी त्यांच्या जवळ राहतात. आणि मादा शिकारीसाठी बाहेर पडतात.

वाळवंटी कासव-

जवळपास ५० ते ८० वर्षांपर्यंत जगू शकणारे वाळवंटातील कासव केवळ ५०-६० अंश तापमानातही आरामात जगत नाहीत, तर त्याला अनेक महिने पाण्याची गरजसुद्धा नसते, कारण ते आपल्या मूत्राशयात पाणी साठवून ठेवते. या पाण्याचे ऊर्जेत रूपांतर करून ते त्यांच्या अन्नाची गरजही पूर्ण करतात. त्यामुळे हे कासव अनेक महिने खाल्ल्याशिवाय राहू शकतात.

मगर-

महिनाभर काहीही न खाता जगण्यात मगरीचाही समावेश होतो. याचे महत्वाचे कारण म्हणजे त्यांचे पचनदेखील खूप मंद असते, ज्यामुळे ते काहीही न खाता पिता दीर्घकाळ जगू शकतात आणि शरीरातील ऊर्जा पातळी राखू शकतात.

टार्डीग्रेड-

तुम्हाला वाचून आश्चर्याचा धक्का बसेल पण टार्डीग्रेड हा असा प्राणी आहे जो अन्नाशिवाय ३० वर्षे जगण्यास सक्षम आहे. हे प्राणी त्यांच्या शारीरिक हालचाली थांबवतात आणि त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण केवळ ३ टक्के राहते, तेव्हा त्यांना अन्न मिळताच ते खूप सक्रिय होतात.

कोमोडो ड्रॅगन-

कोमोडो ड्रॅगन हा प्राणी शिकार करण्यात अत्यंत कुशल समजला जातो. हा ड्रॅगन काहीही न खाता आठवडे किंवा महिनेही जगू शकतो. त्यांच्या तोंडातून अशी लाळ बाहेर पडते, ज्याचे विष काही मिनिटांत कोणाचाही जीव घेऊ शकते. हरणाचे बाळ असो वा शेळी, त्यांना गिळणे कोमोडो ड्रॅगनसाठी अवघड काम नाही. त्यांच्या शरीरात अन्न खूप हळू पचते. त्यामुळे ते कित्येक दिवस त्यावर जगू शकतात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner