मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Alzheimer's Day 2023: केवळ कमकुवत स्मरणशक्तीच नाही तर अल्झायमर झाल्यास दिसतात ही ५ लक्षणं

World Alzheimer's Day 2023: केवळ कमकुवत स्मरणशक्तीच नाही तर अल्झायमर झाल्यास दिसतात ही ५ लक्षणं

Sep 21, 2023 11:13 AM IST

What is Alzheimer Disease: अल्झायमर ही स्मृतिभ्रंशामुळे होणारी एक विशेष मेंदूची समस्या आहे. ज्यामध्ये व्यक्तीला दैनंदिन काम आणि छोटी कामे करण्यातही अडचणीचा सामना करावा लागतो. याबाबत जाणून घ्या सविस्तर

अल्झायमरची लक्षणे
अल्झायमरची लक्षणे (unsplash)

Symtoms and Early Signs of Alzheimer: अल्झायमर आजार टाळण्यासाठी आणि योग्य उपचार करण्यासाठी दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी जागतिक अल्झायमर दिवस साजरा केला जातो. अल्झायमर हा एक प्रकारचा मेंदूचा विकार आहे, जो काळानुसार वाढतच जातो. प्रथिने जास्त प्रमाणात जमा झाल्यामुळे मेंदूच्या कार्यावर याचा झपाट्याने परिणाम होतो. अल्झायमर आजारामुळे मेंदू आकुंचन पावतो आणि मेंदूच्या पेशी जवळजवळ मृत होतात. जगभरात सुमारे ५५ दशलक्ष लोक स्मृतिभ्रंश या आजाराने तर अमेरिकेत ६.५ दक्षलक्ष लोक अल्झायमरने ग्रस्त आहेत. अल्झायमर हा डिमेंशियामुळे होणारा प्रमुख आजार आहे. अल्झायमरची समस्या असल्यास स्मरणशक्ती कमकुवत होण्यासोबतच ही प्रारंभिक लक्षणे दिसू लागतात.

गोष्टी लक्षात ठेवण्यात अडचण

घराची चावी विसरणे किंवा एखादी विशेष घटना विसरणे ही एक सामान्य समस्या आहे. पण जेव्हा ही समस्या तुम्हाला बराच काळ त्रास देते, जसे की नाव विसरणे, एखादी विशेष तारीख विसरणे किंवा बोलत असताना, आपण काय बोलत होतो ते विसरणे आणि पुन्हा पुन्हा तेच बोलणे असे होत असेल तर हे सर्व व्यक्ती अल्झायमरच्या समस्येने ग्रस्त असल्याची चिन्हे आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

अचानक मूड बदलणे किंवा व्यक्तिमत्वात बदल होणे

सौम्य स्वभावाची व्यक्ती वयानुसार आक्रमक होणे किंवा अचानक मूड बदलणे ही अल्झायमरची लक्षणे आहेत. गर्दीची ठिकाणे न आवडणे, एकटे बसणे किंवा एखाद्या वृद्ध व्यक्तीला शारीरिक हालचाली करणे कठीण वाटणे ही देखील अल्झायमरची लक्षणे आहेत.

छोटी-छोटी कामे करण्यातही अडचण

वाढत्या वयाबरोबर दैनंदिन कामे करण्यात अडचण येत असेल तर ही अल्झायमरची लक्षणे आहेत. जसे की घराचा रस्ता विसरणे, बाजाराचा रस्ता विसरणे, मोबाईल, ओव्हन किंवा कशाचाही वापर कसा करायचा हे विसरणे, दरवाजा बंद करायला विसरणे.

बोलण्यात अडचण

अल्झायमरचा त्रास झाल्यास सर्वात मोठी अडचण बोलण्यात येते. सोप्या भाषेत समजल्यास एखादी व्यक्ती एखाद्या विशिष्ट वस्तूचे नाव विसरतो. जसे फोनला दुसऱ्या नावाने उल्लेख करणे. किंवा जर तुम्ही लिहायला किंवा वाचायला विसरलात तर ही अल्झायमर आजाराची सुरुवातीची लक्षणे आहेत.

 

डिप्रेशरशी संबंधित आहे अल्झायमर

दीर्घकाळापासून नैराश्याने ग्रासलेल्या रुग्णांमध्ये वाढत्या वयाबरोबर अल्झायमरची समस्या दिसून येते. असे रुग्ण जे पूर्वी खूप आनंदी आणि सामाजिक होते, अल्झायमरच्या समस्येमुळे त्यांना एकटे राहणे आणि लोकांना भेटणे आवडत नाही.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel