World Alzheimer Day: तुम्हाला माहीत आहेत का अल्झायमरची लक्षणं? जाणून घ्या ते कसे टाळावे-world alzheimer day 2024 what are the symptoms of alzheimer know how to avoid it ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Alzheimer Day: तुम्हाला माहीत आहेत का अल्झायमरची लक्षणं? जाणून घ्या ते कसे टाळावे

World Alzheimer Day: तुम्हाला माहीत आहेत का अल्झायमरची लक्षणं? जाणून घ्या ते कसे टाळावे

Sep 20, 2024 10:43 PM IST

How to Avoid Alzheimer: अल्झायमर हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये मेंदूच्या पेशी संकुचित होऊ लागतात. ज्यामुळे स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते. जाणून घ्या काय आहेत या आजाराची लक्षणे आणि त्यापासून बचाव कसा करावा.

World Alzheimer Day- अल्झायमरची लक्षणं
World Alzheimer Day- अल्झायमरची लक्षणं (freepik)

Symptoms of Alzheimer: म्हातारपणी स्मरणशक्ती कमी होणे ही एक सामान्य समस्या आहे. बहुतेक लोक एखाद्या ठिकाणी वस्तू किंवा गोष्ट ठेवून ते विसरतात, तर अनेक वेळा गोष्टी आठवतही नाहीत. काही प्रकरणांमध्ये असंही होतं की लोक तासन्तास एका वस्तूचा शोध घेत राहतात. जरी हे अगदी सामान्य आहे, परंतु जर ही समस्या आपल्या दैनंदिन जीवनात व्यत्यय आणत असेल तर ती अल्झायमर असू शकते. हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये मेंदूच्या पेशी संकुचित होऊ लागतात. ज्यामुळे स्मरणशक्ती कमी होऊ लागते. हा डिमेंशियाचा सामान्य प्रकार आहे. जाणून घ्या या आजाराची लक्षणे कोणती आहेत आणि त्यापासून बचाव कसा करावा.

अल्झायमरची लक्षणं

स्मरणशक्ती कमी होणे हे अल्झायमर रोगाचे मुख्य लक्षण आहे. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये अलीकडील घटना किंवा संभाषण लक्षात ठेवण्यास अडचण येणे समाविष्ट आहे. तथापि, रोग जसजसा वाढत जातो तसतशी स्मरणशक्ती कमी होते आणि इतर लक्षणे देखील उद्भवतात.

या आजाराची सुरुवातीची लक्षणे -

- विचार व्यक्त करण्यासाठी योग्य शब्द शोधण्यात अडचण.

- नेहमीपेक्षा जास्त वस्तू गमावणे किंवा चुकीच्या ठिकाणी ठेवणे.

- नियोजन किंवा संघटन करण्यात अडचण येणे.

- समस्या सोडवण्यात अडचण येणे.

- दैनंदिन कामे पूर्ण करण्यासाठी वेळ लागणे.

- गोष्टी आणि प्रश्नांची वारंवार पुनरावृत्ती करणे.

- अशा ठिकाणी हरवणे जे त्यांना नीट माहित होत्या किंवा ओळखीच्या होत्या.

अल्झायमरची लक्षणे कशी टाळावीत

- रक्तातील साखर व्यवस्थापित करा. मधुमेह असल्यास आपल्या रक्तातील साखर कशी नियंत्रित करावी हे जाणून घ्या.

- हेल्दी जेवण आणि नियमित शारीरिक अॅक्टिव्हिटी केल्याने निरोगी वजन राखण्यास मदत होते.

- धूम्रपान सोडल्यास मेंदूचे आरोग्य राखण्यास आणि हृदयरोग, कर्करोग, फुफ्फुसांचा आजार आणि धूम्रपानाशी संबंधित इतर आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.

- मद्यपान करत असाल तर ते कमी प्रमाणात प्या. किंवा ते टाळा.

- हा आजार टाळण्यासाठी पुरेशी झोप घेणं खूप गरजेचं आहे.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner