World Alzheimer Day: बोलताना आठवतच नाही नाव किंवा महत्वाच्या गोष्टी? असू शकते गंभीर आजाराची सुरुवात-world alzheimer day 2024 cant remember names or important things when talking ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World Alzheimer Day: बोलताना आठवतच नाही नाव किंवा महत्वाच्या गोष्टी? असू शकते गंभीर आजाराची सुरुवात

World Alzheimer Day: बोलताना आठवतच नाही नाव किंवा महत्वाच्या गोष्टी? असू शकते गंभीर आजाराची सुरुवात

Sep 21, 2024 09:07 AM IST

What is Alzheimer's: जागतिक अल्झायमर दिन दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी अल्झायमर रोग आणि स्मृतिभ्रंश याबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्याच्या आव्हानांचा सामना करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.

World Alzheimer Day 2024
World Alzheimer Day 2024 (freepik)

Alzheimer's Symptoms: अल्झायमर रोगाचा धोका जगभरात वाढत आहे. २०२० च्या आकडेवारीनुसार, ५५ दशलक्ष अर्थातच ५.५ कोटीपेक्षा जास्त लोक अल्झायमर आणि त्यामुळे होणाऱ्या स्मृतिभ्रंशाचे बळी पडले आहेत. ही संख्या साधारणपणे दर दोन दशकांनी दुप्पट होण्याचा अंदाज आहे. वाढत्या वयाबरोबर गोष्टी विसरणे, स्मरणशक्ती कमी होणे, तर्कशक्तीत अडचण येणे हा आजार सामान्य आहे. जागतिक अल्झायमर दिन दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी अल्झायमर रोग आणि स्मृतिभ्रंश याबद्दल जागरूकता वाढवणे आणि त्याच्या आव्हानांचा सामना करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.

ज्या त्यावेळी गोष्टी न आठवणे किंवा एखाद्याचे नाव वेळेवर लक्षात न राहणे, ही सामान्य गोष्ट आहे. पण जर तुम्हाला हा त्रास वारंवार होत असेल आणि त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन कामांवर होत असेल तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण यामागे काही न्यूरो-सायकियाट्रिक समस्याही असू शकतात.

लिहिताना किंवा बोलतांना वस्तू किंवा माणसांची नावे लक्षात न राहणे याला वैद्यकीय भाषेत 'ॲनोमिया' समस्या म्हणतात. या विकाराने ग्रस्त असलेल्या लोकांना असे वाटते की, त्यांच्या जिभेवर शब्द आहेत परंतु ते व्यक्त करण्यास असमर्थ आहेत. तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कुणालाही अशी समस्या आहे का? असे असेल तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

बोलताना शब्दच न सापडणे-

बऱ्याचदा तुम्ही प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूला अनेक मुलाखती दरम्यान वस्तू किंवा खेळाडूंची नावे विसरताना पाहिले असेल. उदाहरणार्थ, जर तुम्हाला त्यांना सांगायचे असेल की, एका खेळाडूला फिल्डिंगसाठी फाईन लेगवर पाठवले होते आणि त्याने उत्कृष्ट कॅच घेतला. परंतु तो असे म्हणताना दिसतो की, - मी त्याला तिथे पाठवले आणि त्याने एक उत्तम कॅच घेतला.

आपल्या आजूबाजूलाही असे लोक असतात, जे सतत नावे किंवा काहीतरी गोष्टी विसरतात असं तुमच्या लक्षात येतं. पण माहितीच्या कमतरतेमुळे त्यांना असं होत असल्याचं तुम्हाला वाटतं. त्यामुळे तुम्ही त्याकडे फारसं लक्ष देत नाही. परंतु तज्ज्ञांच्या मते, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. काही परिस्थितींमध्ये, हे अल्झायमर रोगाचे लक्षणदेखील असू शकते.

मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की, अशा समस्यांकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. कारण अल्झायमर रोग आणि स्मृतिभ्रंश यांसारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांच्या सुरुवातीच्या टप्प्यातही ॲनोमियाची लक्षणे दिसू शकतात. याशिवाय, दीर्घकालीन ताणतणावाने ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये स्ट्रोकचा धोका वाढतो ज्यामुळे ॲनोमिक ऍफेसिया होऊ शकते.या समस्यांचे वेळेवर निदान आणि उपचार केल्याने अनेक न्यूरोसायकियाट्रिक विकारांचा धोका कमी होण्यास मदत होते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner