World AIDS Day: फक्त लैंगिक संबंधानेच नव्हे 'या' कारणांमुळेही पसरतो एड्स, जाणून घ्या बचावाचे उपाय
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  World AIDS Day: फक्त लैंगिक संबंधानेच नव्हे 'या' कारणांमुळेही पसरतो एड्स, जाणून घ्या बचावाचे उपाय

World AIDS Day: फक्त लैंगिक संबंधानेच नव्हे 'या' कारणांमुळेही पसरतो एड्स, जाणून घ्या बचावाचे उपाय

Dec 01, 2024 09:07 AM IST

Treatment for AIDS in marathi: सामान्यतः लोक या आजाराबद्दल उघडपणे बोलण्यास घाबरतात. याचे कारण असे की लोकांचा असा समज आहे की, एड्सचा बळी केवळ शारीरिक संबंधांमुळे म्हणजेच लैंगिक क्रियांमुळे होतो.

How is AIDS spread in marathi
How is AIDS spread in marathi (freepik)

How is AIDS spread in marathi: एड्स हा एक धोकादायक आजार आहे. ज्याबद्दल लोकांच्या मनात आजही अनेक प्रश्न आहेत. अशा आजारांबद्दल लोकांची अपूर्ण माहिती त्यांच्यासाठी हानिकारक ठरते. अशा परिस्थितीत या आजाराबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. हा दिवस विशेषतः लोकांना या गंभीर आजाराबद्दल जागरूक करण्यासाठी आणि या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो.

सामान्यतः लोक या आजाराबद्दल उघडपणे बोलण्यास घाबरतात. याचे कारण असे की लोकांचा असा समज आहे की, एड्सचा बळी केवळ शारीरिक संबंधांमुळे म्हणजेच लैंगिक क्रियांमुळे होतो. परंतु, हे पूर्णपणे सत्य नाही. अशा स्थितीत एड्स दिनानिमित्त आम्ही तुम्हाला हा आजार काय आहे आणि लैंगिक संपर्काशिवाय इतर कोणत्या मार्गांनी लोकांना त्याचा बळी बनवू शकतो हे सांगणार आहोत. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेउया...

काय आहे एड्स?

डब्ल्यूएचओच्या मते, एड्स हा एक धोकादायक आजार आहे. जो मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस म्हणजेच एचआयव्ही विषाणूमुळे एखाद्या व्यक्तीला त्याचा बळी बनवतो. हा विषाणू शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो. ऍक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम (एड्स) हा एचआयव्ही विषाणूमुळे होणाऱ्या संसर्गाचा शेवटचा टप्पा आहे.

एड्सचा प्रसार कसा होतो?

लैंगिक संपर्कातून एड्स पसरू शकतो असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु, शारीरिक संबंध न ठेवताही तो एखाद्या व्यक्तीला त्याचा बळी बनवू शकतो. हे मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही) मुळे होते, जे विशिष्ट शारीरिक द्रवांद्वारे पसरते. संक्रमणाच्या इतर मार्गांमध्ये एचआयव्ही-संक्रमित रक्ताने दूषित सुया किंवा सिरिंज वापरणे, संक्रमित रक्त किंवा रक्त उत्पादनांच्या संपर्कात येणे आणि एचआयव्ही पॉझिटिव्ह आईकडून गर्भधारणेदरम्यान, बाळंतपणात किंवा स्तनपान करवण्याच्या काळात तिच्या मुलापर्यंत येणे यांचा समावेश होतो.

AIDS is not only spread through sexual intercourse, but also through these reasons
AIDS is not only spread through sexual intercourse, but also through these reasons (freepik)

याशिवाय, संक्रमित सुई टोचल्यामुळे अनावधानाने किंवा अपघाती इजा झाल्यामुळे आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना एचआयव्हीची लागण होऊ शकते. परंतु, HIV ग्रस्त व्यक्तीला मिठी मारून, हस्तांदोलन केल्याने किंवा अन्न खाल्ल्याने HIV पसरत नाही. तसेच, ते हवा, पाणी किंवा कीटकांच्या चाव्याव्दारे पसरत नाही.

हे कसे रोखायचे?

-सुया आणि सिरिंज कोणाशीही शेअर करणे टाळा.

-फक्त तपासलेले रक्त उत्पादने वापरा.

-जर तुम्ही आरोग्य सेवा कर्मचारी असाल, तर संभाव्य संसर्गजन्य सामग्री हाताळताना संरक्षणात्मक उपकरणे वापरा.

-एचआयव्ही असलेल्या ज्या स्त्रिया मुलांना जन्म देतात त्यांनी बाळामध्ये विषाणू पसरण्याची शक्यता कमी करण्यासाठी वैद्यकीय मदत घ्यावी.

-एचआयव्हीवर उपचार करण्यासाठी आणि त्याच्या संसर्गाची शक्यता कमी करण्यासाठी एआरटी अत्यंत प्रभावी आहे.

-एचआयव्हीबद्दल शिकणे, सुरक्षितपणे इंजेक्शन देणे आणि जागरूकता वाढवणे या विषाणूचा प्रसार रोखण्यात खूप मदत करू शकते.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner