Workout Tips: जिममध्ये घाम गाळताना होऊ शकते खांद्याला दुखापत! वर्कआऊट करताना ‘अशी’ घ्या काळजी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Workout Tips: जिममध्ये घाम गाळताना होऊ शकते खांद्याला दुखापत! वर्कआऊट करताना ‘अशी’ घ्या काळजी

Workout Tips: जिममध्ये घाम गाळताना होऊ शकते खांद्याला दुखापत! वर्कआऊट करताना ‘अशी’ घ्या काळजी

Published Oct 10, 2024 04:36 PM IST

Workout Tips Shoulder Injury: खांद्यांमध्ये तीन महत्त्वाची हाडे असतात. ही हाडे खांद्यांच्या सांध्यांशी जोडलेली असतात. यामुळे खांद्याच्या कोणत्याही भागात या वेदना जाणवू शकतात.

Shoulder Injury
Shoulder Injury

Workout Tips Shoulder Injury : सध्याच्या काळात खांदे दुखीच्या समस्येने अनेक लोक त्रस्त असतात. खांद्याच्या दुखण्यामागे बरीच कारणे असू शकतात. दुखापत, सातत्याने होणारी हालचाल, वजनदार वस्तू उचलणे, अपघात, खेळणे किंवा वाढते वय या कारणांमुळे खांद्याचे दुखणे उद्भवू शकते. खांद्याच्या दुखण्यामुळे हाताच्या हालचालीवर मर्यादा येते. खांद्यांमध्ये तीन महत्त्वाची हाडे असतात. ही हाडे खांद्यांच्या सांध्यांशी जोडलेली असतात. यामुळे खांद्याच्या कोणत्याही भागात या वेदना जाणवू शकतात. रोटेटर कफ टिअर्स, खांद्याला इजा होणे, बर्साइटिस, फ्रोझन शोल्डर, टेंडोनिटिस आणि अगदी फ्रॅक्चर यासारख्या विविध समस्यांचा धोका वाढू शकतो. जिममध्ये वर्कआऊट करताना देखील अशा समस्या उद्भवू शकतात. अशा समस्या टाळण्यासाठी शोल्डर स्पेशॅलिस्ट डॉ. आदित्य साई यांनी काही खास टिप्स दिल्या आहेत.

वॉर्म अप करा

वर्कआऊट रूटीन सुरू करण्यापूर्वी तुम्ही व्यवस्थित वॉर्म अप करत आहात याची दक्षता घ्या. वेदनामुक्त हालचालींसाठी आपल्या खांद्याच्या स्नायूंचे वॉर्म अप करण्यावर लक्ष केंद्रित करा. स्ट्रेचिंग आणि कार्डिओ करा, जे हलके फुलके आणि सोपे वॉर्म अप प्रकार आहेत. हे व्यायाम रक्त प्रवाह सुरळीत करण्यास प्रोत्साहन देतात. वर्क आऊटच्या आधी किमान ५ ते १० मिनिटे वॅार्म अप केले पाहिजे. ते तुमच्या खांदयांना व्यायामासाठी तयार करतात. त्यामुळे खांद्यांना दुखापत होण्याचा धोका देखील कमी होऊ शकतो.

शरीराचा समतोल राखा

चुकीच्या शारीरिक मुद्रेमुळे खांद्याच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. जास्त वजन उचलताना शरीराचा योग्य समतोल राखण्याचा प्रयत्न करा. बेंच प्रेस, ओव्हरहेड लिफ्ट्स किंवा ट्रायसेप्स एक्स्टेंशन, अरनॉल्ड प्रेस, फ्रंट राइज किंवा लॅटरल राइजेस यासारख्या काही व्यायामा दरम्यान चुकीचे संतुलन तुमच्या खांद्यावर अतिरिक्त ताण आणू शकते.

Celebrity Fitness: वयाच्या पन्नाशीतही दिसायचंय तरुण? फॉलो करा कतरिना- दीपिकाच्या जिम ट्रेनरचं हे सीक्रेट

हळूहळू व्यायामाची तीव्रता वाढवा

जड वस्तू, किंवा वजन उचलणे किंवा तीव्र कसरत करणे टाळा. यामुळे तुमच्या खांद्याच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे खांद्यांना दुखापत आणि फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. हळूहळू आपल्या व्यायामाची तीव्रता वाढवा. यामुळे तुमचे स्नायू आणि सांध्यांना समतोल साधण्यास मदत होईल.

खांदा मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करा

खांद्याच्या दुखापतींचा धोका कमी करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे तुमचे स्नायू मजबूत करणे. हे तुमच्या खांद्याच्या सांध्यांना अधिक स्थिर बनवते त्यांना उत्तम आधार देते. यामुळे अचानक दुखापती किंवा दीर्घकालीन समस्येचा धोका कमी होतो.

Whats_app_banner