मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Women Day Special: महिलांच्या ताटात नक्की असावे हे सुपरफूड, मिळतात असंख्य फायदे

Women Day Special: महिलांच्या ताटात नक्की असावे हे सुपरफूड, मिळतात असंख्य फायदे

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 07, 2024 12:27 PM IST

Women Health Care Tips: दरवर्षी ८ मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. खरं तर जेव्हा महिला तिच्या आरोग्याची काळजी घेईल तेव्हाच हा दिवस साजरा करण्याचा उद्देश पूर्ण होईल. महिलांनी आपल्या रोजच्या जेवणाच्या ताटात कोणत्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे हे जाणून घ्या.

महिलांनी निरोगी आरोग्यासाठी आहारात या सुपरफूडचा समावेश करावा
महिलांनी निरोगी आरोग्यासाठी आहारात या सुपरफूडचा समावेश करावा (freepik)

Super Foods for Women: घरातील एक व्यक्ती जी रात्रंदिवस काम करते. ती आहे घरातील स्त्री, ती आई, बहीण, पत्नी, कोणत्याही नात्यात असू शकते. आपले कुटुंब निरोगी राहावे यासाठी ती कधीही न थकता काम करत असते, प्रत्येकाची काळजी घेत असते. पण महिलांनी कुटुंबासोबतच स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तसं तर स्त्रियांच्या शरीरात आयुष्यभर काही बदल होत राहतात. मासिक पाळीपासून सुरु होऊन गर्भधारणा, स्तनपान, मेनोपॉज यांसारखी अनेक टप्पे असतात. काही वेळा त्यांना विविध प्रकारचे पोषण आवश्यक असते. महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर त्यांनी हे पदार्थ त्यांच्या ताटात नक्कीच समाविष्ट करावेत. जेणेकरून त्या निरोगी तर राहतीलच शिवाय त्यांच्या कुटुंबाची आणि घराचीही पूर्ण काळजी घेऊ शकतील. महिलांनी आपल्या रोजच्या आहारात कोणत्या पदार्थांना समावेश केला पाहिजे ते जाणून घ्या.

फ्लेक्स सीड्स

फ्लेक्स सीड्स ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि डायटरी फायबरने समृद्ध असतात. त्यात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. फ्लेक्स सीड्समध्ये अशी संयुगे असतात जी हार्मोनल आरोग्य संतुलित करण्यास मदत करतात. जे महिलांसाठी सुपरफूडपेक्षा कमी नाही. याशिवाय फ्लेक्स सीडमुळे कॅलरीजचे प्रमाणही कमी होते.

अक्रोड

हे महिलांसाठी एक शक्तिशाली नट आहे. हे खाल्ल्याने झोप येण्यास मदत होते. अक्रोडमुळे कोलेस्टेरॉलची पातळीही कमी होते. अक्रोड कर्करोगासारख्या घातक आजारापासून संरक्षण करते. एवढेच नाही तर रजोनिवृत्तीनंतर ऑस्टिओपोरोसिस झाल्यास महिलांनी आहारात अक्रोडाचा समावेश करावा. त्यामुळे सांधेदुखी दूर होते.

पपई

व्हिटॅमिन ए आणि ई ने समृद्ध असलेली पपई महिलांचे सौंदर्य वाढवण्यास मदत करते. अँटीऑक्सिडंट्स कॅरोटीन्स आणि फ्लेव्होनॉइड्स स्त्रियांच्या मासिक पाळीचे नियमन करतात आणि त्यांना कोलन कर्करोगासारख्या आजारांपासून दूर ठेवतात.

दही

महिलांच्या जेवणाच्या ताटात दही अवश्य समाविष्ट करा. हे त्यांना केवळ कॅल्शियमच पुरवत नाही तर हे व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता देखील दूर करते. ज्या महिला शाकाहारी आहेत त्यांना दही हे मुंग्या येणे आणि व्हिटॅमिन बी१२ मुळे होणाऱ्या समस्यांपासून आराम देते. याशिवाय दही रक्तातील ग्लुकोजची पातळी राखते. तसेच प्रत्येक स्त्रीने आपल्या डेली रुटीनमध्ये डाळी, कडधान्ये, संपूर्ण धान्य, हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश करावा. जेणेकरून ती निरोगी राहील. या सुपरफूडच्या महिलांच्या आरोग्याला अनेक फायदे मिळतात.

बेरी

क्रॅनबेरी महिलांमध्ये यूटीआयची समस्या कमी करण्यास मदत करते. महिलांना UTI चा सर्वाधिक धोका असतो. अशा परिस्थितीत क्रॅनबेरीचा रस फायदेशीर ठरू शकतो. याशिवाय स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ब्लॅकबेरी हे त्वचेसाठी चांगले मानले जातात.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel