Test And Health Checkup for Women: महिला अनेकदा त्यांच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत, हे तुम्ही पाहिले असेलच. परिणामी लहान समस्या मोठ्या आजाराचे रूप घेते. जर तुम्हाला स्वतःला निरोगी ठेवायचे असेल, तर तुमच्या शरीरातील लक्षणांच्या आधारे वेळोवेळी काही तपासण्या करा. जेणेकरून योग्य उपचारांच्या मदतीने आजार टाळता येतील. महिला दिनानिमित्त महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या मोहिमेत महिलांनी कोणत्या टेस्ट नक्की केल्या पाहिजे हे जाणून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून आजारचे निदान वेळेवर होऊन उपचार करता येतील. महिलांनी निरोगी राहण्यासाठी काही चाचण्या आणि चेकअप नियमित केले पाहिजे.
गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतातील महिलांमध्ये आढळणारा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. ब्लीडिंग, पोटदुखी, पाठदुखी किंवा काही लक्षणे नसताना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोगाची चाचणी करून करून घेणे आवश्यक आहे. ज्यामध्ये पॅप स्मीअर चाचणी, एचपीव्ही चाचणी समाविष्ट आहे. जेणेकरून वेळेवर उपचार करून, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या धोक्यांपासून स्वतःचे रक्षण करता येईल. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी वयाच्या २१व्या वर्षापासून करता येते. लक्षणे नसतानाही दर पाच वर्षांनी चाचणी करणे आवश्यक आहे.
वयाच्या १५ व्या वर्षापासून महिलांना मधुमेहाचा धोका असतो. ते नियंत्रणात ठेवण्यासाठी रक्तातील ग्लुकोजची तपासणी करून घेणे गरजेचे आहे. जेणेकरून मधुमेह किंवा प्री-डायबेटिस ओळखता येईल.
स्तनामध्ये छोटीशी गाठ, दुखणे किंवा ढिले पडणे असे असल्यास, स्तनाच्या कर्करोगासाठी चाचणी करणे आवश्यक आहे. ४५ ते ७५ वर्षे वयापर्यंत महिलांनी प्रत्येक वर्षी किंवा दोन वर्षांनी मॅमोग्राम चाचणी करावी.
लिपिड प्रोफाइल चाचणी रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी निर्धारित करण्यात मदत करते. एलडीएल, एचडीएल, ट्रायग्लिसरॉइड हे तिन्हींबद्दल सांगते. जेणेकरून हृदयाच्या आरोग्याविषयी माहिती मिळू शकेल आणि पूर्ण काळजी घेता येईल.
भारतातील अर्ध्याहून अधिक महिलांना लोहाची कमतरता आहे. त्यामुळे ॲनिमिया होण्याचा धोका असतो. म्हणून वेळोवेळी लोहाच्या पातळीच्या अभ्यासाच्या मदतीने ही कमतरता शोधणे महत्वाचे आहे.
थायरॉईड समस्या महिलांमध्ये अधिक सामान्य होत आहेत. म्हणून टीएसएच (TSH), टी३ (T3), टी४ (T4) पातळी तपासणे आवश्यक आहे. जेणेकरून थायरॉईडच्या कार्याचे नियमन करता येईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)