मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dear Ladies! पब्लिक टॉयलेट वापरताना चुकूनही करू नका या चुका, आरोग्यासाठी ठरतात घातक

Dear Ladies! पब्लिक टॉयलेट वापरताना चुकूनही करू नका या चुका, आरोग्यासाठी ठरतात घातक

Jun 26, 2024 12:58 PM IST

Mistakes While Using Public Toilets: टॉयलेटच्या सीटवर अनेक प्रकारचे जंतू आणि बॅक्टेरिया दिसत नाहीत, ज्यामुळे महिलांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. पब्लिक टॉयलेटचा वापर करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून घ्या.

पब्लिक टॉयलेटचा सुरक्षितपणे वापर करण्यासाठी टिप्स
पब्लिक टॉयलेटचा सुरक्षितपणे वापर करण्यासाठी टिप्स (unsplash)

Tips to Use Public Toilets Safely for Women: अनेकदा ऑफिस, मॉल किंवा बाहेर महिला फ्रेश होण्यासाठी पब्लिक टॉयलेटचा वापर करतात. पण काही वेळा असे करताना नकळत झालेल्या काही चुका त्यांना अनेक गंभीर इन्फेक्शनला बळी पाडतात. खरं तर पब्लिक टॉयलेटच्या सीटवर न दिसणारे अनेक प्रकारचे जंतू आणि बॅक्टेरिया असतात, ज्यामुळे महिलांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशावेळी जाणून घेऊया अशाच काही चुकांबद्दल, ज्या महिलांनी पब्लिक टॉयलेट वापरताना टाळायला हव्यात.

पब्लिक टॉयलेट वापरताना या चुका करु नका

इंडियन सीटचा वापर

जर तुम्ही वॉशरूममध्ये असाल जिथे इंडियन आणि वेस्टर्न दोन्ही सीट उपलब्ध असतील तर इंडियन वॉशरूमचाच वापर करण्याचा प्रयत्न करा. यामुळे योनिमार्गातील संसर्गाचा धोका बऱ्याच अंशी कमी होतो.

ट्रेंडिंग न्यूज

सॅनिटायझरचा वापर करा

आजकाल बाजारात अनेक प्रकारचे टॉयलेट सीट सॅनिटायझर उपलब्ध आहेत. आपण त्यांना आपल्या पर्समध्ये नेऊ शकता. सार्वजनिक शौचालयाचा वापर करण्यापूर्वी सीटवर स्प्रे करा. यामुळे अनेक प्रकारचे बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात.

हातांनी दरवाजांना हात लावू नका

पब्लिक टॉयलेटचा वापर करताना टॉयलेट लीड, दरवाजे, फरशी आणि टॉयलेट पेपरला हात लावावा लागणार नाही याची विशेष काळजी घ्या. हे करण्यापूर्वी प्लास्टिक डिस्पोजेबल ग्लव्स वापरा. जर ग्लव्स उपलब्ध नसल्यास तुम्ही साधे टिश्यू पेपरही वापरू शकता. फ्लश दाबण्यासाठी टिश्यू वापरा. टिश्यू पेपरने फ्लश दाबल्याने फ्लशशी थेट हाताचा संपर्क होणार नाही.

हँड वॉश महत्वाचे

पब्लिक टॉयलेटचा वापर केल्यानंतर संसर्गापासून स्वत:चा बचाव करायचा असेल तर टॉयलेट वापरल्यानंतर हात स्वच्छ धुवा. यासाठी हात आणि बोटे हँडवॉशने २०-३० सेकंद चांगले चोळून धुवा. सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये हात धुण्यासाठी गरम आणि थंड असे दोन्ही पर्याय असतील तर गरम पाण्याचा वापर करा. जेणेकरून हातातील जीवाणू मरतील.

बॅग आणि फोन आत नेऊ नका

पब्लिक टॉयलेटमध्ये सगळीकडे एक प्रकारचा जंतू असतो. अशावेळी टॉयलेटमध्ये बॅग, फोन सारख्या गोष्टी नेणे टाळायला हव्यात. अनेकदा वॉशरूम वापरताना लोक आपली बॅग वॉशरूमच्या फरशीवर ठेवतात, जे चुकीचे आहे. आपण आपले सामान बाहेर ठेवले किंवा कोणाजवळ दिले तर बरे होईल.

हँड वॉशऐवजी साबणाचा वापर

अनेकदा महिला हात धुण्यासाठी सार्वजनिक शौचालयात ठेवलेल्या साबणाचा वापर करतात. पण अशी चूक करणे टाळा. सार्वजनिक स्वच्छतागृहे वापरणाऱ्या लोकांबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही, त्यामुळे हात धुण्यासाठी साबणाऐवजी पेपर सोप किंवा हँडवॉशचा वापर केल्यास बरे होईल.

स्क्वॅट टाळा

अनेकदा पब्लिक टॉयलेट अस्वच्छ असताना महिला त्याचा वापर करताना स्क्वॅट करण्याचा प्रयत्न करतात. परंतु असे करणाऱ्या स्त्रिया त्यांच्या पेल्विक फ्लोअरचे नुकसान करू शकतात. महिलांच्या या चुकीच्या सवयीमुळे त्यांचा पेल्विक फ्लोअर कमकुवत होऊ शकतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel