Women Health : प्रायव्हेट पार्ट्स काळवंडलेत? टेन्शन नका घेऊ! ‘या’ सोप्या टिप्सने त्वचा होईल पुन्हा चमकदार
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Women Health : प्रायव्हेट पार्ट्स काळवंडलेत? टेन्शन नका घेऊ! ‘या’ सोप्या टिप्सने त्वचा होईल पुन्हा चमकदार

Women Health : प्रायव्हेट पार्ट्स काळवंडलेत? टेन्शन नका घेऊ! ‘या’ सोप्या टिप्सने त्वचा होईल पुन्हा चमकदार

Published Oct 28, 2024 01:20 PM IST

Intimate Area Skin Dullness : प्रायव्हेट पार्ट्सचा रंग नैसर्गिकरित्या शरीराच्या इतर भागांपेक्षा थोडा गडद असतो. परंतु काही वेळा इतर अनेक कारणांमुळे योनीभोवतीची त्वचा रुक्ष आणि काळी होऊ लागते.

प्रायव्हेट पार्ट्स काळवंडलेत?
प्रायव्हेट पार्ट्स काळवंडलेत? (Shutterstock)

Women Intimate Area Skin Blackness : आपल्या शरीरात अशा काही गोष्टी असतात, ज्याबद्दल आपल्याला माहिती नसते. आपण इतके मोकळेपणाने त्याबद्दल बोलू शकत नाही, पण अनेक महिलांना त्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. त्यापैकीच एक म्हणजे प्रायव्हेट पार्ट्सचा काळेपणा. ही समस्या खूप सामान्य आहे आणि कधीकधी ही एक नैसर्गिक समस्या असू शकते. परंतु, बऱ्याच स्त्रियांना त्याबद्दल खूप असुरक्षित वाटते. लग्न करणाऱ्या अनेक मुलींना आपल्या जोडीदारासमोर आपली ही समस्या दिसू नये, अशी भीती असते. मात्र, हे अगदीच नॉर्मल आहे आणि त्याबद्दल लाज वाटणे व्यर्थ आहे. कधीकधी इतर बाह्य कारणांमुळे योनीच्या सभोवतालची त्वचा आधीच काळी पडू लागते आणि बरीच रुक्ष देखील होते, ज्यासाठी आपण काही सुरक्षित घरगुती उपाय करून पाहू शकता.

कोरफड जेल

त्वचा आणि केसांसाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. कोरफडीचा गर म्हणजेच जेल त्वचेला हायड्रेटेड ठेवते आणि मृत त्वचा काढून टाकते. यामुळे त्वचेची चमक परत येते. प्रायव्हेट पार्टचा काळेपणा दूर करण्यासाठीही कोरफड जेलचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी काळवंडलेल्या भागावर कोरफड जेल लावून २० मिनिटे ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून दोन ते तीन वेळा असे केल्याने हळूहळू प्रायव्हेट पार्टचा काळेपणा कमी होऊ लागेल.

Diwali: दिवाळीसाठी साफसफाई करून चेहरा काळवंडलाय, 'या' वस्तू लावल्यास मिळेल फेशिअलसारखा ग्लो

दही

दही नैसर्गिक क्लिंजर म्हणून काम करते. दही त्वचेसाठी अनेक प्रकारे उपयुक्त आहे. दहीमध्ये पुरेशा प्रमाणात लॅक्टिक आम्ल असते, जे नैसर्गिक ब्लीचसारखे काम करते. हे त्वचेच्या मृत पेशी काढून त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते. प्रायव्हेट पार्टचा काळेपणा दूर करण्यासाठी चमचाभर दही घेऊन प्रभावित भागावर लावा आणि नंतर गोलाकार गतीने किमान ५ मिनिटे मसाज करा. आता ते त्वचेवर १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर कोमट पाण्याने त्वचा धुवा. असे केल्याने प्रायव्हेट पार्टची त्वचा मऊ होईल आणि त्याचा काळेपणा बऱ्याच अंशी दूर होईल.

बेसन

प्रायव्हेट पार्टचा काळेपणा दूर करण्यासाठी बेसन आणि लिंबाची पेस्ट वापरू शकता. यामुळे त्वचा स्वच्छ होईल आणि त्याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. लिंबू त्वचेचीचे पिग्मेंटेशन काढून टाकण्याचे काम करतो आणि बेसन मृत त्वचा काढून टाकते. प्रायव्हेट पार्टचा काळापणा या दोघांच्या पेस्टने बऱ्याच अंशी दूर होऊ शकतो. यासाठी प्रथम दोन चमचे बेसन, एका लिंबाचा रस, थोडे पाणी आणि चिमूटभर हळद एकत्र करून जाड पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट प्रभावित भागावर व्यवस्थित लावा आणि १० मिनिटे ठेवा. सुकल्यानंतर स्वच्छ पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. काही दिवसांतच त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसेल.

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

Whats_app_banner