Women health PCOS Problem: आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. खाण्यापिण्याच्या बदललेल्या वेळा, कामाचं बदललेलं स्वरूप या सगळ्यात महिला त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं विसरूनच जातात. सध्या महिलांमध्ये पीसीओडी आणि पीसीओएस या समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या हार्मोनल असंतुलनाच्या समस्या आहे. पीसीओएसमध्ये महिलांच्या शरीरात अंडाशयाच्या बाहेर लहान सिस्ट अर्थात गाठी तयार होतात. या द्रवाने भरलेल्या सिस्टमध्ये अविकसित अंडी असतात. त्यामुळे स्त्रीच्या शरीरातील नियमित होणारी अंडकोशातील उत्पादन प्रक्रिया थांबते. पीसीओएसच्या समस्येचे नेमके कारण सांगता येत नाही. पण, ही समस्या अधिकतर लठ्ठपणा असणाऱ्या महिलांमध्ये अधिक दिसून येते.
मात्र, अशा स्त्रिया किंवा किशोरवयीन मुली ज्या अंगकाठीने बारीक आहेत आणि त्यांना नियमित मासिक पाळी येते, त्यांनाही पीसीओएसचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे भविष्यात गरोदरपणात समस्या येण्यासोबतच टाइप २ मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका देखील वाढतो. नियमित मासिक पाळी येऊनही ‘ही’ लक्षणे दिसू लागली तर, समजून घ्या की तुम्हालाही पीसीओएसची समस्या आहे.
> चेहऱ्यावर केस
> अचानक जास्त केस गळणे आणि केस गळणे
> मासिक पाळीच्या आधी आणि नंतर बद्धकोष्ठतेची समस्या
> त्वचेवर गडद ठिपके
> मासिक पाळीपूर्वी भावनिक होणे
> गोड खाण्याची तीव्र इच्छा
> नियमित मासिक पाळी येऊनही तीव्र वेदना होणे
> नितंब आणि मांड्यांभोवती चरबी वाढणे
> निपल्सभोवती केस
नियमित मासिक पाळी येऊनही शरीरात अशी लक्षणे दिसू लागली तर, ती पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमची अर्थात पीसीओएसची समस्या असू शकते. यावर मात करण्यासाठी योग्य आहार आणि उपचार आवश्यक आहेत. अशावेळी तातडीने डॉक्टरांची मदत घेणे आवश्यक आहे.
पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचे नेमके कारण सांगता येत नाही. मात्र, यात काही महत्त्वाची ‘ही’ करणे असू शकतात.
इन्सुलिन प्रतिकार: इन्सुलिन हार्मोन शरीराला ऊर्जा देण्याचे काम करते. परंतु, जेव्हा पेशी इन्सुलिनच्या क्रियेला प्रतिसाद देत नाहीत, तेव्हा रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते. त्यामुळे शरीराला जास्त प्रमाणात इन्सुलिन तयार करावे लागते. जेणेकरून रक्तातील साखरेची पातळी कमी होईल. इन्सुलिनच्या जास्त प्रमाणामुळे, पुरुष हार्मोन एंड्रोजन शरीरात तयार होऊ लागतो. त्यामुळे स्त्रीबिजांना त्रास होतो. जर एखाद्या महिलेच्या कौटुंबिक इतिहासात पीसीओएसची समस्या असेल, तर ती त्या महिलेला होण्याची देखील शक्यता जास्त असते.
शरीरात सूज येणे: संशोधनात असे दिसून आले आहे की, ज्या महिलांना PCOS ची समस्या आहे. त्यांना दीर्घकाळ सूज येण्याची समस्या असते. एखादी दुखापत झाल्यावर पांढऱ्या रक्त पेशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे सूज येते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)