Women Health: नव्याने ‘आई’ झालेल्या महिलांमध्ये उद्भवू शकतात आरोग्याच्या ‘या’ समस्या, जाणून घ्या कसा कराल सामना?
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Women Health: नव्याने ‘आई’ झालेल्या महिलांमध्ये उद्भवू शकतात आरोग्याच्या ‘या’ समस्या, जाणून घ्या कसा कराल सामना?

Women Health: नव्याने ‘आई’ झालेल्या महिलांमध्ये उद्भवू शकतात आरोग्याच्या ‘या’ समस्या, जाणून घ्या कसा कराल सामना?

Jun 22, 2024 10:29 AM IST

लॅन्सेट या नियतकालिकाने केलेल्या अभ्यासानुसार, भारतात दरवर्षी सुमारे चार कोटी महिलांना बाळंतपणाशी संबंधित आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या काय आहेत आणि त्यांना कसे सामोरे जायचे, जाणून घ्या डॉ. नीतू गाबा यांच्याकडून…

नव्याने ‘आई’ झालेल्या महिलांमध्ये उद्भवू शकतात आरोग्याच्या ‘या’ समस्या, जाणून घ्या कसा कराल सामना?
नव्याने ‘आई’ झालेल्या महिलांमध्ये उद्भवू शकतात आरोग्याच्या ‘या’ समस्या, जाणून घ्या कसा कराल सामना?

Women Health: गरोदरपणाच्या नऊ महिन्यांनंतर आणि प्रसूतीच्या वेदना सहन करून बाळाला जन्म देणे सोपे काम नाही. या काळात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल होतात आणि या दरम्यान त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. तज्ज्ञांच्या मते, प्रसूतीदरम्यान महिलेचे शरीर दर तासाला २०० ते ६०० कॅलरी बर्न करते, जे जिममध्ये एक तास कठोर व्यायाम करण्यासारखे आहे. एवढ्या अडचणी आणि आव्हानांनंतरही नवीन आई आपल्या नवजात बाळाची काळजी घेण्यासाठी लगेच शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार होत नाही. प्रसूतीपूर्वी आणि प्रसूतीनंतर नवीन आईला आरोग्याशी संबंधित अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. परंतु, बाळाला जन्म दिल्यानंतर मिळणाऱ्या आनंदात आईच्या सर्व समस्या दुर्लक्षित होऊन जातात. सर्वांचे लक्ष बाळाकडे जात असल्याने, आईकडे लक्ष जात नाही. पण या काळात पतीने पत्नीची पूर्ण काळजी घेणं आणि तिच्या गरजा समजून घेणं महत्त्वाचं आहे. नव्या आईला आरोग्याच्या कोणत्या आव्हानांची जाणीव असायला हवी, जाणून घेऊया…

डिप्रेशन 

या काळात डिप्रेशन ही एक सामान्य समस्या आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर आईला नैराश्य येण्याची दाट शक्यता असते. भारतातील सुमारे २२ टक्के नवीन माता या समस्येशी झगडत आहेत. या परिस्थितीत त्यांना दु:ख, चिंता आणि थकवा जाणवतो. प्रसुतिपूर्व नैराश्य सहसा बाळाला जन्म दिल्यानंतर काही आठवड्यांनंतर सुरू होते. परंतु, कधीकधी ते एका वर्षानंतर सुरू होऊ शकते. यासाठी शरीरातील हार्मोनल बदल, नैराश्याच्या तीव्र समस्या आणि जीवनातील तणावपूर्ण घटना आणि मानसिक आधाराचा अभाव या गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. सतत दु:खी राहणे, विविध कामांमध्ये रस नसणे, बाळाशी आपुलकी निर्माण करण्यात अडचण येणे, बाळाला किंवा स्वत:ला इजा पोहोचवण्याचे विचार ही या नैराश्याची लक्षणे आहेत. प्रसुतिपूर्व नैराश्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वैद्यकीय मदत घ्यावी लागते. तसेच, त्यासाठी कुटुंबीय आणि मित्र-मैत्रिणींची ही मदत आवश्यक असते. 

Yoga Mantra: शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतात ही ३ योगासनं, सकाळी करण्यासाठी आहेत उत्तम

स्तनपानातील आव्हाने 

स्तनपान ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण, बाळाला जन्म दिल्यानंतर नव्या आईला यात अनेकदा आव्हानांचा सामना करावा लागतो. स्तनपानाशी संबंधित काही समस्या म्हणजे स्तनाग्र दुखणे, मास्टिटिस (स्तनाचा संसर्ग) आणि कमी दूध तयार होणे. स्तनपानाच्या समस्येच्या लक्षणांमध्ये स्तनपान करताना वेदना होणे, बाळाचे वजन वाढणे आणि स्तन फुगणे यांचा समावेश आहे. या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्तनपान सल्लागार किंवा वैद्यकीय सल्ला घ्यावा. हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की, स्तनपानाचा प्रवास प्रत्येक मातेसाठी वेगळा असतो. आई आणि बाळ यांच्या आयोग्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

Good Morning Wishes: एकापेक्षा एक जबरदस्त मॅसेज पाठवून म्हणा गुड मॉर्निंग, दिवस होईल खास

जीवघेण्या ठरू शकतात ‘ही’ समस्या

बाळंतपणानंतर अनेक महिलांमध्ये रक्तस्त्राव होणे, अनेकवेळा प्राणघातक ठरू शकते. या अवस्थेत प्रसूतीनंतर महिलेला प्रचंड रक्तस्त्राव होतो. हे सहसा प्रसूतीनंतर पहिल्या २४ तासांच्या आत होते. परंतु, प्रसूतीनंतर १२ आठवड्यांपर्यंत हे होऊ शकते. ही स्थिती प्रसूतीमध्ये बराच वेळ लागणे, एकाच वेळी अनेक बाळांना जन्म देणे किंवा प्लेसेंटाच्या समस्येमुळे उद्भवू शकते. प्रचंड रक्तस्त्राव होणे, चक्कर येणे, हृदयगती खूप वेगवान होणे, रक्तदाब अचानक कमी होणे ही त्याची लक्षणे आहेत. हे टाळण्यासाठी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उपचारांमध्ये गंभीर प्रकरणांमध्ये औषधे, रक्त संक्रमण आणि शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर आईला यापैकी कोणतीही लक्षणे जाणवल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

पेल्विक फ्लोर डिसऑर्डर

‘पेल्विक फ्लोर डिसऑर्डर’ ही एक सामान्य समस्या आहे, जी प्रसूतीनंतर स्नायूंच्या कमकुवतपणामुळे उद्भवते. पेल्व्हिसमध्ये मूत्राशय, गर्भाशय, प्रोस्टेट आणि मलाशय यासारख्या अवयवांचा समावेश असतो. शरीरात हेच अवयव संपूर्ण शरीर निरोगी ठेवतात. पेल्विक फ्लोर डिसऑर्डरच्या सामान्य लक्षणांमध्ये वारंवार लघवी होणे, शरीर जड वाटणे, शौचास त्रास होणे इत्यादींचा समावेश आहे. पेल्विक फ्लोर स्नायू तपासण्यासाठी डॉक्टर शारीरिक तपासणी करू शकतात. यावर उपचार करण्याच्या काही उपायांमध्ये केगेलसारख्या पेल्विक फ्लोर व्यायामाचा समावेश आहे. याशिवाय फिजिकल थेरपी आणि काही प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेनेही उपचार करता येतात.

Pregnancy Tips: प्रेग्नेंसीच्या सहाव्या महिन्यात हाय हील्स घालताना दिसली दीपिका पदुकोण, जाणून घ्या का टाळावे हील्स

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner