Rules of Undergarments for Women: महिला शारीरिक आरोग्याकडे प्रचंड लक्ष देतात. महिलांना शारीरिक सौंदर्य जपणे नेहमीच आवडते. बहुतांश वेळी स्त्रिया आपला सर्व वेळ आपल्या त्वचेची आणि केसांची काळजी घेण्यात घालवतात. पण खरं तर तुमच्या इंटिमेट एरियाला अर्थातच प्रायव्हेट भागांना विशेष काळजीची गरज आहे. इंटिमेट स्वच्छतेची काळजी घेण्याव्यतिरिक्त, तुम्हाला हे माहित असले पाहिजे की, तुम्ही घालत असलेल्या अंतर्वस्त्रांमुळे प्रायव्हेट भागांनादेखील नुकसान होऊ शकते. निरोगी आणि स्वच्छ इंटिमेट एरियासाठी सर्व महिलांनी अंडरगारमेंटचे काही नियम लक्षात ठेवले पाहिजेत. आज आपण याच नियमांबाबत जाणून घेणार आहोत.
अंडरगारमेंट्स खरेदी करताना, त्याचे फॅब्रिक काळजीपूर्वक तपासा. मऊ आणि हलके सुती कापड निवडा. जर तुम्ही पॉलिस्टरपासून बनवलेल्या पँटीज घेतल्या तर ते तुमच्या योनीला पूर्णपणे पॅक करते आणि हवेचा प्रवाहच रोखते. यामुळे संसर्गाचा धोका वाढतो, म्हणून कॉटन पॅन्टी घाला, जेणेकरून हवा त्यातून जाऊ शकेल. जेव्हा हवेचा संचार रोखला जात नाही, तेव्हा योनिमार्गाच्या त्वचेवर ओलावा जमा होत नाही आणि तुम्हाला ताजेतवाने वाटते. त्यामुळे अंडरगारमेंट्स खरेदी करताना पॅन्टीजच्या कपड्याची विशेष काळजी घ्या.
निरोगी इंटिमेट एरियासाठी रात्री झोपताना पॅन्टी घालणे टाळा. अनेकदा आपण पॅन्टीज दिवसभर घालतो. तर रात्री सुद्धा त्या परिधान केल्याने प्रायव्हेट भागात हवा जाण्यास प्रतिबंध होतो. दिवसभर ओलाव्याने भिजत राहिल्याने त्वचेवर जळजळ होऊ शकते. तर कधी कधी खाज सुटल्याने संसर्गाचा धोकाही वाढतो. अशा समस्या टाळण्यासाठी, रात्री पॅन्टी न घालणे उत्तम आहे.
तुम्ही वर्षानुवर्षे एकच अंडरगारमेंट्स सतत घालू शकत नाही. ते बदलणे फार महत्वाचे आहे. काही दिवसातच पॅन्टी ब्लीच होऊन त्यावर डाग दिसू लागतात. म्हणून, 3 महिन्यांच्या आत पॅन्टीची नवीन जोडी खरेदी करा. अशा प्रकारे तुमचा संसर्गापासून बचाव होतो आणि तुम्हाला ताजेतवाने वाटते.
तुमच्या योनीमार्गे विविध रंग आणि घनतेमध्ये स्त्राव डिस्चार्ज होतो. जर स्त्राव जड असेल तर तीच पॅन्टी घालू नका. अन्यथा संसर्ग होऊ शकतो. म्हणून, जर तुम्हाला डिस्चार्ज वाटत असेल तर तुमची पॅन्टी नक्कीच बदला. दिवसातून दोनदा पॅन्टीज बदलण्याचा प्रयत्न करा. डिस्चार्ज झाल्यास पॅन्टीज काढून टाका, अन्यथा ओलाव्यामुळे बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते. त्यातून विविध आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात.
तुमचा प्रायव्हेट एरिया तुमच्या विचारापेक्षा जास्त संवेदनशील आहे. महिलांना हे तोपर्यंत समजत नाही जोपर्यंत त्यांना प्रत्यक्षात मोठी समस्या येत नाही. त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवू देऊ नका. पॅन्टी स्वच्छ करण्यासाठी नेहमी सौम्य डिटर्जंट वापरा. सामान्य साबण आणि डिटर्जंट वापरल्याने तुमच्या पॅन्टीला संसर्ग होऊ शकतो. तोच संसर्ग तुमच्या शरीरात प्रवेश करू शकतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)