At what age does menstruation stop: एका विशिष्ट वयानंतर किशोरवयीन मुलींमध्ये, मासिक पाळी सुरू होते. प्रत्येक स्त्रीला दर महिन्याला अशाप्रकारे सलग १२ महिने मासिक पाळीच्या वेदनेतून जावे लागते. अशा प्रकारची शारीरिक स्थिती स्त्रियांसाठी आवश्यक आहे. त्याच वेळी, वाढत्या वयानुसार मासिक पाळीदेखील संपतात. मासिक पाळी येण्यासाठी योग्य वय १२ वर्षे आहे. परंतु अलीकडच्या काळात बदलेल्या जीवनशैलीमुळे हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळे काहीवेळा मुलींना वयाच्या ८ व्या किंवा अगदी १५ व्या वर्षी मासिक पाळी सुरू होते.
ज्या वयात मासिक पाळी थांबते ते वय ४५ ते ५० वर्षे असते. या स्थितीला रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज असे म्हणतात. पण रजोनिवृत्तीचा अनुभव प्रत्येक स्त्रीसाठी वेगळा असू शकतो. रजोनिवृत्ती ही एक अशी आरोग्य स्थिती आहे ज्यामध्ये स्त्रीला सलग १२ महिने मासिक पाळी येणे बंद होते. या स्थितीत गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते. रजोनिवृत्ती ही एक सामान्य स्थिती आहे. जरी त्याच्याशी संबंधित काही समस्या आहेत. स्त्रीची मासिक पाळी बंद होणार आहे, म्हणजेच ती स्त्री रजोनिवृत्तीच्या जवळ आहे हे कसे समजावे?याचीसुद्धा काही लक्षणे असतात. आज आपण या सर्वांबाबत जाणून घेणार आहोत.
वयाच्या एका खास टप्प्यांनंतर महिलांमध्ये जेव्हा मासिक पाळी अनियमित होऊ लागते. तेव्हा त्याचे एक कारण रजोनिवृत्ती असू शकते. जरी आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे किंवा गर्भधारणेदरम्यान मासिक पाळी अनियमित होत असली तरी, हे रजोनिवृत्तीचे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे. मासिक पाळी थांबण्याआधी, मासिक पाळीच्या दरम्यान रक्त प्रवाह कधीकधी वाढू किंवा कमी होऊ शकतो.
मासिक पाळी थांबण्यापूर्वी योनिमार्गात कोरडेपणा आणि खाज येऊ शकते. रजोनिवृत्ती दरम्यान एखाद्या महिलेला तिच्या त्वचेवर कट आणि जखमअसल्यास, संसर्गाचा धोका देखील वाढू शकतो. त्यामुळे अशावेळी विशेष काळजी घ्यावी लागते.
यामध्ये शरीराच्या वरच्या भागात जास्त उष्णता जाणवू शकते. मासिक पाळी चुकल्यास चेहरा, मान आणि छातीमध्ये जास्त उष्णता जाणवू शकते. जास्त घाम येणे आणि त्वचेवर पुरळ येऊ शकतात.
रजोनिवृत्तीच्या बाबतीत, तुम्हाला निद्रानाशाची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे झोपण्यास त्रास होऊ शकतो. अशावेळी उदासीनता, चिंता किंवा मूड बदलण्याची लक्षणे स्त्रियांमध्ये दिसून येतात. याशिवाय मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो.
स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ती ४२ वर्षांच्या वयानंतर सुरू होते. परंतु ४५ ते ५० वर्षांच्या दरम्यान मासिक पाळी थांबते. रजोनिवृत्तीपूर्वी, मासिक पाळी कमी होते आणि काही काळानंतर ती पूर्णपणे थांबते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)