Face Pack With Oats: कोरियन मुली आणि मुलांची त्वचा काचेसारखी चमकदार आणि निर्दोष असते. म्हणूनच प्रत्येकाला त्यांच्यासारखी ग्लास स्किन हवी असते. कोरियन स्किनची वाढती क्रेझ पाहून आम्ही तुमच्यासाठी आणखी एक मस्त फेस पॅक घेऊन आलो आहोत. चेहरा उजळण्यासाठी तुम्ही ओट्स आणि दूध मिसळून फेस पॅक तयार करू शकता. या महिला दिनाला तुम्हाला कोरियन ग्लास स्किन हवी असेल तर तुम्ही हा ओट्सचा फेस पॅक लावू शकता. जाणून घ्या घरच्या घरी ओट्सपासून फेस पॅक कसा बनवायचा.
- ३ चमचे ओट्स
- २ चमचे दूध
- १/२ टीस्पून मध
- १/२ कप पाणी
हा फेस पॅक बनवण्यासाठी ३ चमचे ओट्स अर्धा कप पाण्यात उकळा. हे तोपर्यंत उकळा जोपर्यंत त्याचे बॅटर तयार होणार नाही. आता हे कोरडे होऊ द्या. आणि ग्राइंडरच्या भांड्यात ठेवा. आता ही पेस्ट दुधात बारीक करून घ्या. नंतर त्यात मध टाका.
हा फेस पॅक बनवून बाजूला ठेवा आणि नंतर चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. आता फेसपॅक स्वच्छ चेहऱ्यावर २० मिनिटे लावा. पॅक सुकल्यानंतर चेहऱ्याला मसाज करा आणि नंतर थंड पाण्याने धुवा.
ओट्स चेहऱ्यासाठी, त्वचेसाठी फायदेशीर असतात. ओट्समध्ये अनेक सक्रिय गुण असतात. हे सॅपोनिन्स, फ्लेव्होनॉइड्स, खनिजे, अल्कलॉइड्स, स्टिरॉइड संयुगे, जीवनसत्त्वे आणि कॅरोटीनने भरलेले आहे. तर दुधामुळे त्वचा स्वच्छ होते. याशिवाय मध त्वचेला मॉइश्चरायइझ करण्यास मदत करते. असे हे ओट्स फेस पॅक कोरियन ग्लास स्किन मिळवण्यासाठी बेस्ट आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या