मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Women Day Gift Ideas: या महिला दिनाला आपल्या आयुष्यातील स्पेशल लेडीला द्या हे खास गिफ्ट

Women Day Gift Ideas: या महिला दिनाला आपल्या आयुष्यातील स्पेशल लेडीला द्या हे खास गिफ्ट

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 05, 2024 11:27 PM IST

International Women's Day 2024: जर तुम्हाला या महिला दिनाला तुमच्या आयुष्यातील एखाद्या खास महिलेला स्पेशल फील द्यायचा असेल तर तुम्ही तिला हे काही खास गिफ्ट देऊ शकता.

महिला दिनासाठी गिफ्ट आयडिया
महिला दिनासाठी गिफ्ट आयडिया (unsplash)

Women Day Gift Ideas: आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी जगभरात साजरा केला जातो. महिलांचे योगदान आणि त्यांच्या संघर्षाची लोकांना जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी हा विशेष दिवस साजरा केला जातो. तुम्हालाही हा खास दिवस तुमच्या आयुष्यातील एखाद्या खास स्त्रीसाठी आणखी खास बनवायचा असेल तर तुम्ही तिला हे सुंदर गिफ्ट देऊ शकता. जाणून घ्या महिला दिनाच्या काही खास गिफ्ट आयडिया.

ज्वेलरी गिफ्ट करा

जर तुमच्या लेडी लव्हला दागिन्यांची खूप आवड असेल, तर तिला आनंद देण्यासाठी तुम्ही तिला या महिला दिनानिमित्त अंगठी, कानातले, नोस पिन किंवा तिच्या आवडीचे कोणतेही ज्वेलरी भेट देऊ शकता. स्पेशल ज्वेलरीने तिला स्पेशल वाटू शकते.

पुस्तके

तुमच्या आयुष्यात विशेष स्थान असलेल्या स्त्रीला जर वाचनाची आणि लेखनाची आवड असेल तर तिला गिफ्ट देण्यासाठी पुस्तके ही एक उत्तम भेट ठरू शकते. ही एक भेट आहे जी कायम त्यांच्यासोबत राहील. तुम्ही त्याचे आवडते लेखक, फिक्शन, नॉन फिक्शन किंवा साहित्याशी संबंधित कोणतेही पुस्तक भेट देऊ शकता.

कामातून द्या सुटी

तुम्ही तुमच्या आई, बहीण किंवा पत्नीला या दिवशी घरातील कामातून सुट्टी देऊन त्यांना विशेष फिल देऊ शकता. तुम्ही दिलेली ही भेट तिला नक्कीच खूप आवडेल.

स्मार्ट वॉच

स्मार्ट वॉच केवळ हातात चांगले दिसत नाही तर व्यक्तिमत्त्वातही भर घालते. आकर्षक लुक देण्यासोबतच हे घड्याळ अनेक फीचर्ससह येते. ज्यामध्ये तुम्ही वेळ पाहू शकता आणि तुमचे फिटनेसही ट्रॅक करू शकता.

पार्टी करा प्लॅन

घरातील आणि घराबाहेरच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिला अनेकदा स्वतःला आनंदी ठेवायला विसरतात. अशा परिस्थितीत या महिला दिनी त्यांच्या चेहऱ्यावरचे हरवलेले हास्य परत आणण्यासाठी तुम्ही काही खास प्लॅन करू शकता. महिला दिनाच्या या खास प्रसंगी तुम्ही तुमच्या आई, पत्नी किंवा बहिणीसाठी घरी पार्टीचे आयोजन करू शकता. या पार्टीत तिच्या मैत्रिणी आणि कुटुंबातील महिलांचा समावेश करा, ज्यांच्यासोबत ती वेळ घालवते. असे केल्याने त्यांना चांगले आणि आनंदी वाटेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग