Women Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Women Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Women Day 2024: कधी आणि का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय महिला दिवस? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Mar 04, 2024 09:22 PM IST

International Women Day 2024: आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी आहे, आपण तो का साजरा करतो, त्याचा इतिहास आणि महत्त्व याबाबत येथे जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय महिला दिन - इतिहास आणि महत्त्व
आंतरराष्ट्रीय महिला दिन - इतिहास आणि महत्त्व (pinterest)

History And Significance of International Women's Day: "स्त्री ही भविष्य आहे" आणि ते साध्य होईपर्यंत, महिलांना समान बुद्धिमत्तापूर्ण संधी, प्रतिनिधित्व आणि प्रभाव असलेल्या भविष्याचे स्वप्न पाहण्यापासून आपण थांबू शकत नाही, ज्यामुळे सर्वांसाठी अधिक न्याय्य आणि समान समाज निर्माण होईल. म्हणून, जर तुम्ही समाजात प्रगतीची क्षमता असल्याचे मानत असाल, तर महिलांना सक्षम करणे आणि लैंगिक समानतेला राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांसह जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिनापेक्षा चांगला दिवस नाही. इतिहासात स्त्रियांचे समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि भविष्यात अजूनही मोठे योगदान देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे, आपण सर्वजण या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा वापर करून सर्व जणांसाठी चांगले भविष्य घडवण्यासाठी महिलांचे सक्षमीकरण करू शकतो, त्यांना नेतृत्वाची भूमिका घेण्यासाठी आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा आवाज ऐकवण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो. दरवर्षी ८ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन (international women's day) साजरा केला जातो.

आंतराष्ट्रीय महिला दिनाचा इतिहास (International Women Day History)

युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनच्या (युनेस्को) मते विसाव्या शतकात उत्तर अमेरिका आणि युरोपमधील कामगार चळवळींच्या कार्यातून आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा उदय झाला. न्यूयॉर्कमध्ये १९०८ मध्ये झालेल्या गारमेंट कामगारांच्या संपाच्या स्मरणार्थ २८ फेब्रुवारी १९०९ रोजी अमेरिकेत पहिला राष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. १९४५ मध्ये संयुक्त राष्ट्रांची सनद हा स्त्री-पुरुष समानतेच्या तत्त्वावर शिक्कामोर्तब करणारा पहिला आंतरराष्ट्रीय करार ठरला. त्यानंतर ८ मार्च १९७५ रोजी आंतरराष्ट्रीय महिला वर्ष दरम्यान संयुक्त राष्ट्रसंघाने आपला पहिला अधिकृत आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला.

१९७७ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने ठराव स्वीकारल्यानंतर, आंतरराष्ट्रीय महिला दिन मुख्य प्रवाहातील जागतिक सुट्टी बनला. या दिवशी सदस्य राष्ट्रांना ८ मार्च हा महिलांच्या हक्क, अधिकारांसाठी आणि जागतिक शांततेसाठी संयुक्त राष्ट्रसंघाचा अधिकृत सुट्टी म्हणून घोषित करण्याचे आवाहन करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व (international women day significance)

स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी आणि लिंगभेदमुक्त चांगला समाज निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. या दिवशी महिलांचा सन्मान केला जातो आणि महिलांच्या समान हक्कांसारख्या समस्या, महिलांवर होणारा अत्याचार व शोषण तसेच प्रजनन हक्कांसारख्या विषयांवर प्रकाश टाकला जातो.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे सेलिब्रेशन (international women's day celebration)

आपल्या आयुष्यातील महिलांना खास वाटण्यासाठी हृद्यस्पर्शी कृती करून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. तुम्ही त्यांना त्यांच्या आवडत्या हॉटेलमध्ये डिनरसाठी नेऊ शकता, हाताने बनविलेल्या वस्तू गिफ्ट करू शकता, स्त्री लेखिकांनी लिहिलेली पुस्तके भेट देऊ शकता, महिलांच्या हक्कांवर आणि लिंग समानतेवर स्वतःला शिक्षित करू शकता, त्यांचे आवडते चित्रपट पाहू शकता आणि याहूनही बरेच काही करू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner