मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Women Day 2024 Special: मुली गुगलवर शोधतात पीरियडशी संबंधित या प्रश्नांचे उत्तरं, तुम्हाला माहीत आहेत का?

Women Day 2024 Special: मुली गुगलवर शोधतात पीरियडशी संबंधित या प्रश्नांचे उत्तरं, तुम्हाला माहीत आहेत का?

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 05, 2024 10:37 PM IST

Periods or Menstrual Cycle: महिलांना दर महिन्याला मासिक पाळीचा सामना करावा लागतो. मात्र, तरीही त्यांच्या मनात याबाबत संभ्रम कायम आहे. जाणून घ्या मासिक पाळीशी संबंधित प्रश्नांची उत्तरे, जी सर्वात जास्त सर्च केल्या जातात.

महिला दिन - पीरियड संबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरे
महिला दिन - पीरियड संबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरे (freepik)

Most Asked Question Related to Periods: आंतरराष्ट्रीय महिला दिन दरवर्षी ८ मार्च रोजी साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सन्मानाचा आहे. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश लैंगिक समानतेचा संदेश पसरवणे आणि विविध क्षेत्रातील महिलांचे कर्तृत्व आणि योगदान साजरे करणे हा आहे. या खास प्रसंगी महिलांच्या आरोग्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया. महिला दर महिन्याला मासिक पाळीचा सामना करतात. मात्र, तरी देखील ती याबाबत उघडपणे बोलण्यास कचरते. अशा परिस्थितीत पीरियड्सशी संबंधित अशा प्रश्नांची उत्तरे येथे जाणून घ्या जी प्रत्येक मुलीला जाणून घ्यायची असतात. अनेकदा ही प्रश्नांची उत्तरे मुली गुगलवर शोधतात.

किती तासात पॅड बदलावे?

पॅड कधी आणि किती वेळा बदलावे याबद्दल महिलांमध्ये संभ्रम असतो. हे पूर्णपणे तुमच्या फ्लोवर अवलंबून आहे. प्रत्येक स्त्रीसाठी हे वेगळे असू शकते. तथापि, सर्व महिलांनी दर ४ ते ८ तासांनी पॅड बदलावे. लक्षात ठेवा जर फ्लो जास्त असेल आणि पॅड लवकर खराब होत असेल तर तुम्ही ते बदलत राहिले पाहिजे.

पीरियड्स दरम्यान अधिक वेळा शौच का करतो?

हे पूर्णपणे हार्मोन्समुळे होते. तुमच्या मासिक पाळीच्या आधीच्या दिवसांमध्ये तुम्हाला बद्धकोष्ठता जाणवू शकते. परंतु तुमच्या मासिक पाळीच्या दरम्यान प्रोजेस्टेरॉन नावाचा हार्मोन बाहेर पडतो. ज्यामुळे तुमच्या आतड्यांच्या हालचालींमध्ये बदल होतो.

पॅडपेक्षा टॅम्पन आणि मेंस्ट्रुअल कप चांगले आहेत का?

या तिन्ही गोष्टी तितक्याच प्रभावी आहेत. एक स्त्री तिघांपैकी कोणतेही निवडू शकते, जे तिला सर्वात सोयीस्कर वाटेल. अहवालात असे म्हटले आहे की मुली सॅनिटरी पॅडला प्राधान्य देऊ शकतात. कारण टॅम्पन किंवा मेंस्ट्रुअल कप घालणे कठीण असू शकते आणि हायमेनला इजा होऊ शकते.

गरम हीट पॅट पीरियडच्या वेदना कमी करते का?

आपल्या आई आणि आजींनी सुचवलेला हा एक सामान्य उपाय आहे. शेक घेतल्याने वेदना कमी होण्यास मदत होते. तथापि, खूप गरम हीट पॅट त्वचेला नुकसान करू शकते.

पीरियड्स दरम्यान रक्तस्त्रावचे सामन्य प्रमाण किती आहे?

अहवाल सांगतात की मासिक पाळी दरम्यान रक्तस्त्राव होण्याचे प्रमाण ८० मिली पेक्षा जास्त नसावे. जर एखादी महिला पीरियड्स कप वापरत असेल तर ती सहजतेने त्याचे प्रमाण मोजू शकते. पण पॅड किंवा टॅम्पनमधून पीरियड ब्लड किती आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे. मासिक पाळी दरम्यान ब्लिडिंग चार ते पाच दिवसांपेक्षा जास्त नसावा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)