मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: शिक्षणाशिवाय मानवी जीवन आहे व्यर्थ, चाणक्यांकडून जाणून घ्या महत्त्व!

Chanakya Niti: शिक्षणाशिवाय मानवी जीवन आहे व्यर्थ, चाणक्यांकडून जाणून घ्या महत्त्व!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 31, 2024 09:04 AM IST

Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे.

Chanakya Niti
Chanakya Niti

Chanakya Niti on Education: अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या आचार्य चाणक्य यांना त्यांच्या गुण आणि उग्र स्वभावामुळे कौटिल्य असे संबोधले जात असे. चाणक्य यांनी वयाच्या २६ व्या वर्षी समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचे शिक्षण त्या काळातील महान शिक्षण केंद्र तक्षशिला येथून पूर्ण केले. यानंतर त्यांनी शिक्षक म्हणूनही काम केले. चाणक्य ज्यांना भारतीय राजकारण आणि अर्थशास्त्राचे जनक म्हटले जाते. त्यांनी नीती शास्त्र लिहले. चाणक्य यांनी एका श्लोकाद्वारे सांगितले आहे की, आनंदी जीवनासाठी ज्ञान संपादन करणे अत्यंत आवश्यक आहे.

ज्ञान महत्त्वाचे

आचार्य चाणक्य त्यांच्या नीतिशास्त्रातील एका श्लोकाद्वारे म्हणतात की, शिक्षणाशिवाय माणसाचे जीवन कुत्र्याच्या शेपटीसारखे आहे. ज्याचे अस्तित्व नसते. अशिक्षित व्यक्तीला समाजात महत्त्व नसते, लोक अशा व्यक्तीकडे ओझे म्हणून पाहतात.

Chanakya Niti: आयुष्यात सगळ्याच बाबतीत फसवणूक होतेय? चाणक्यांचे हे शब्द करतील मदत!

शिक्षणाने अंधार दूर होतो

आचार्य चाणक्य यांच्या मते जीवनातील अंधार केवळ शिक्षणानेच दूर होऊ शकतो. शिक्षण न घेत असलेला व्यक्ती अंधारात राहतो. त्यामुळे माणसाने प्रथम शिक्षण घेतले पाहिजे.

Chanakya Niti: या ठिकाणी दान करण्यास कधीही संकोच करू नका, जाणून घ्या चाणक्य नीती!

कोणतेही काम करू शकते

आचार्य चाणक्य यांच्या मते मनुष्याचे शिक्षित व्यक्ती कोणतेही काम यशस्वीपणे करू शकते. पण जर तुमच्याकडे ज्ञान नसेल तर तुम्ही साधी कामेही करू शकणार नाही.

Chanakya Niti: यशस्वी आणि श्रीमंत व्हायचे असेल तर या लोकांशी असलेले नाते संपवा!

योग्य-अयोग्याचे ज्ञान मिळते

चाणक्य म्हणतात की केवळ शिक्षणानेच माणसाला काय योग्य आणि अयोग्य हे कळते. शिक्षणाच्या कमतरतेमुळे माणूस योग्य आणि अयोग्य ठरवण्यात अपयशी ठरतो. शिक्षित व्यक्ती योग्य आणि अयोग्य यातील फरक सहज ओळखू शकतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel