Weight Loss : ३८ ची कंबर आली २६ इंचावर… हा सहजसोपा व्यायाम करून इन्फ्ल्यूएन्सरनं घटवलं प्रचंड वजन
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Weight Loss : ३८ ची कंबर आली २६ इंचावर… हा सहजसोपा व्यायाम करून इन्फ्ल्यूएन्सरनं घटवलं प्रचंड वजन

Weight Loss : ३८ ची कंबर आली २६ इंचावर… हा सहजसोपा व्यायाम करून इन्फ्ल्यूएन्सरनं घटवलं प्रचंड वजन

Nov 14, 2024 06:38 PM IST

exercises to lose waist fat: सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर रिद्धी शर्मा तिच्या फिटनेसबाबत आणि वजन कमी करण्याबाबत विविध टिप्स आणि ट्रिक्स शेअर करत असते.

exercises to lose waist fat
exercises to lose waist fat

weight loss exercises in Marathi : वजन कमी करणे हे अनेकांसाठी आव्हानात्मक उद्दिष्ट असू शकते. विशेषत: कंबरेचा आकार कमी करताना भल्याभल्यांना घाम फुटतो. लोक सतत वेट लॉस टिप्स शोधत असतात. दरम्यान सोशल मीडिया इन्फ्ल्यूएंसर रिद्धी शर्मा तिच्या फिटनेसबाबत आणि वजन कमी करण्याबाबत विविध टिप्स आणि ट्रिक्स शेअर करत असते. नुकतंच शेअर केलेल्या एका नवीन व्हिडिओमध्ये, तिने एका व्यायामाच्या सेटद्वारे तिच्या कंबरेचा आकार 38 ते 26 इंचापर्यंत कसा कमी केला हे उघड केले आहे. जर तुम्हीसुद्धा तुमच्या कंबरेचा आकार कमी करण्यासाठी मार्ग शोधत असाल तर हा व्हिडीओ तुम्हाला अत्यंत उपयुक्त आहे. पाहूया रिद्धीने नेमकं काय सांगितलं आहे.

पोटाची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम-

रिद्धी शर्माने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, व्यायामाच्या आधारे तिने पोटाची चरबी मोठ्या प्रमाणात कमी केली आहे. पोटाची चरबी कमी झाल्याने आपोआप तिच्या कंबरेचा आकारसुद्धा कमी झाला आहे. त्यामुळे ती अतिशय फिट आणि हेल्दी दिसत आहे.

प्लँक ट्विस्ट-

कंबरेसाठी हा अत्यंत उपयुक्त व्यायाम आहे. ही प्रक्रिया बाजूंना टोन करण्यास मदत करते. आणि कंबरेला अगदी सडपातळ आणि आकर्षक बनवते.

व्ही सायकल-

वरच्या आणि खालच्या दोन्ही ॲब्सला आकर्षक बनवण्यासाठी हा व्यायाम उत्तम आहे. हा व्यायाम बॉडी टोन्ड करण्यासोबतच पोट अगदी चपातीसारखे सपाट बनवते.

लेग ड्रॉप-

हा व्यायाम खालच्या ॲब्सला लक्ष्य करतो. पोटाची चरबी कमी करण्यास आणि पचनशक्ती सुधारण्यासही मदत करतो.

हे व्यायाम किती वेळा करावेत?

रिद्धीने तिच्या कॅप्शनमध्ये काही उपयुक्त टिप्स शेअर केल्या आहेत. ज्याने तिला तिची फिटनेस ध्येये साध्य करण्यात मदत केली आहे. तिने लिहिले आहे की, “हे माझे काही आवडते व्यायाम आहेत. शिवाय माझे आणखी काही व्यायाम तुम्हाला ते माझ्या रिल्समध्ये सापडतील. मी हे आठवड्यातून किमान 4 ते 5 वेळा केले आहेत. मी प्रत्येक व्यायाम 1 मिनिटासाठी केला. कोणतेही बदल पाहण्यासाठी तुम्हाला किमान ४-५ आठवडे द्यावे लागतील. त्यांनंतरच तुम्हाला योग्य फरक दिसून येईल. शिवाय व्यायामात सातत्य ठेवणे आवश्यक असल्याचे ती सांगते. तुम्हाला फिटनेस साध्य करायचा असेल तर दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. तुमच्या व्यायामात सातत्य नसेल तर तुम्हाला हवा तो रिझल्ट मिळणे शक्य नाही.

Whats_app_banner