दरवर्षी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन भारतात अभिमानाने आणि उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या घटनेच्या अंमलबजावणीचे आणि सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक बनण्याचे प्रतीक आहे.१९५० मध्ये या दिवशी भारताची घटना लागू झाली, ज्याने देशाला एक नवीन ओळख व दिशा दिली. हा दिवस केवळ आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आणि लोकशाहीचा उत्सव नाही तर त्या स्वातंत्र्यसैनिक आणि नेत्यांना लक्षात ठेवण्याचा एक दिवस आहे, ज्यांनी त्यांचे बलिदान दिले आणि देशाला स्वातंत्र्य दिले.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने लोक त्यांच्या मित्रांना, कुटूंबाला आणि प्रियजनांना शुभेच्छा संदेश पाठवतात आणि या ऐतिहासिक दिवसाची आठवण करतात. हे संदेश केवळ देशभक्तीच्या भावनेवरच लक्ष केंद्रित करत नाहीत तर ऐक्य आणि अखंडतेच्या संदेशास देखील प्रोत्साहन देतात. येथे आम्ही आपल्यासाठी प्रजासत्ताक दिनाचे सर्वोत्कृष्ट शुभेच्छा संदेश आणले आहेत, जे आपण आपल्या लोकांना पाठवू शकता.
बलसागर भारत व्हावे, विश्वात शोभूनी राहावे,
भारतभूमीच्या तिरंग्याची शान कायम राहावी
हेच स्वप्न प्रत्येक भारतीयाने कायम पाहावे
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वासाठी ज्यांनी भारतदेश घडविला ….
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
वंदे मातरम्! भारताचा अभिमान असलेल्या
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करूया!
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! जय हिंद!
देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!
प्रत्येक भारतीयासाठी गौरवाचा दिवस!
जय हिंद! प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
विविधतेत एकतेचे प्रतीक म्हणजे भारत!
जय हिंद, प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
भारतीय म्हणून अभिमान बाळगूया.
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
संबंधित बातम्या