Amritsari Paneer Pakora Recipe: थंडीत संध्याकाळच्या चहासोबत नाश्त्यात गरमागरम पकोडे खायला मिळाले तर चटपटीत खाण्याची क्रेविंग शांत करण्यासोबतच चहाची मजाही द्विगुणित होते. कांदा, बटाटा, कोबी, वांगी असे अनेक प्रकारचे पकोडे तुम्ही नक्कीच अनेकदा चाखले असतील. पण अमृतसरी पनीर पकोडा हा सर्वात वेगळा आणि चविष्ट आहे. हे बनवणे सोपे आहे. चला तर मग जाणून घेऊया अमृतसरी पनीर पकोडाची रेसिपी.
- ५०० ग्राम पनीर
- २ चमचे बेसन
- २ चमचे तांदळाचे पीठ
- २ मोठे चमचे मैदा
- १/२ टीस्पून ओवा
- १ टीस्पून आले-लसूण पेस्ट
- १/२ टीस्पून लिंबाचा रस
- १/२ टीस्पून हळद
- १ टीस्पून लाल तिखट
- १ टीस्पून आमचूर पावडर
- एक चिमूटभर हिंग
- चवीनुसार मीठ
- पाणी
अमृतसरी पनीर पकोडा बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बेसन, तांदळाचे पीठ, मैदा, हिंग, ओवा, आले-लसूण पेस्ट, हळद, तिखट, लिंबाचा रस आणि मीठ घ्या. आता त्यात थोडे पाणी घालून सर्व चांगले मिक्स करा आणि बाजूला ठेवा. आता पनीरच्या तुकड्यांवर मीठ शिंपडा. आता पनीरचे तुकडे तयार केलेल्या बॅटरमध्ये बुडवा आणि ते सोनेरी होईपर्यंत तेलात तळून घ्या. पकोडे तळून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढा आणि त्यावर थोडे आमचूर पावडर शिंपडा. हिरवी चटणी आणि चहासोबत गरमागरम पकोडे सर्व्ह करा.