Health Tips: थंडीच्या दिवसांत आवर्जून खा मनुके! मिळतील 'हे' अमेझिंग फायदे
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Health Tips: थंडीच्या दिवसांत आवर्जून खा मनुके! मिळतील 'हे' अमेझिंग फायदे

Health Tips: थंडीच्या दिवसांत आवर्जून खा मनुके! मिळतील 'हे' अमेझिंग फायदे

Published Dec 13, 2023 02:21 PM IST

Winter Health Tips: थंडीच्या ऋतूमध्ये आपल्या आहारात उष्ण पदार्थांचा समावेश करणे अधिक फायदेशीर ठरते. अशावेळी ड्रायफ्रूट्स अर्थात सुका मेवा हा चांगला ऑप्शन असतो.

black currants and raisins
black currants and raisins

Winter Health Tips: हिवाळ्याचा मौसम म्हटला की, अनेक आजारही सोबत येतात. या काळात अनेक व्हायरल आजार देखील पसरतात. अशावेळी आपली इम्युनिटी मजबूत असणे आवश्यक आहे. रोग प्रतिकारक शक्ती कमजोर असेल, तर या काळात अशा व्यक्ती हमखास आजारी पडतात. मात्र, जर तुम्ही तुमच्या आहाराची योग्य ती काळजी घेत असाल, आणि आपल्या आहारात इम्युनिटी वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश करत असाल, तर आजारांपासून दूर राहू शकता. थंडीच्या ऋतूमध्ये आपल्या आहारात उष्ण पदार्थांचा समावेश करणे अधिक फायदेशीर ठरते. अशावेळी ड्रायफ्रूट्स अर्थात सुका मेवा हा चांगला ऑप्शन असतो. सुक्यामेव्यातील मनुके किंवा काळे मनुके हा घटक शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. मनुक्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. पोटाच्या समस्या असणाऱ्या लोकांनी आपल्या आहारात मनुकांचा समावेश आवर्जून केला पाहिजे. मनुक्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे फायबर, व्हिटॅमिन सी, झिंक, आयर्न, कॅल्शियम असे अनेक पोषक घटक असतात. सर्दीच्या दिवसांत आहारात मनुका किंवा काळ्या मनुका सामील करण्याचे 'हे' फायदे वाचाच...

अन्न पचन सुधारते

तुम्ही जर तुमच्या आहारात रोज मनुका खात असाल, तर तुमची पचन संस्था मजबूत होऊ शकते. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, ज्यांचे पोट व्यवस्थित साफ होत नाही, त्यांनी रोज दुधासोबत मनुकांचे सेवन करायला हवे. यामुळे पोटाशी आणि पचनाशी संबंधित समस्या कमी होतील.

Pahadi Masoor Dal Recipe: जेवण्यासाठी बनवा पहाडी मसूर डाळ, जाणून घ्या परफेक्ट पद्धत!

लोहाची कमतरता भरून काढते

अनेकांच्या शरीरात हिमोग्लोबिनची खूप कमतरता असते. अशा लोकांना एनिमिया हा आजार होण्याची शक्यता असते. अशा लोकांनी रोज मनुका खायला हव्यात. मनुकांच्या नियमित सेवनामुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून निघेल.

कॅल्शियम मिळेल

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे केवळ दातच नाही, तर हाडं देखील कमजोर होतात. अनेक लोक शरीरातील कॅल्शियमची पातळी संतुलित राखण्यासाठी दररोज दूध पितात. मात्र, रोज मनुका खाऊन देखील कॅल्शियमची कमतरता भरून काढली जाऊ शकते. यामुळे दात आणि हाडे निरोगी होतील.

वजन नियंत्रित राहील

वजन कमी करण्यासाठी देखील मनुकांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. मनुक्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. मनुका खाल्ल्याने वारंवार भूक लागणे कमी होते. यामुळे पोटात जंकफूड जात नाही, तसेच कॅलरीज देखील कमी होतात. मनुका खाल्ल्याने कॅलरीज बर्न करण्यातही मदत मिळते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner