Causes and Prevention for Sore Throat: थंडीचे प्रमाण वाढले तसा त्याला परिणाम आरोग्यावर होत आहे. सर्दी, खोकला, कफ, घसा खवखवणे या समस्या पुन्हा त्रास देत आहे. घसा खवखवल्याने वेदना, खाज सुटणे किंवा जळजळ होते. जरी ही एक सामान्य समस्या आहे. पण हे अनेक कारणांमुळे होऊ शकते. बहुतेक प्रकरणांमध्ये घसा खवखवणे स्वतःच बरे होते. मात्र काही लोक त्यावर उपाय म्हणून औषधेही घेतात. घसा खवखवणे टाळण्यासाठी सर्वोत्तम आणि सोपा मार्ग म्हणजे श्वसन संक्रमणाने ग्रस्त असलेल्या लोकांपासून दूर राहणे. घसा खवखवणे कमी करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकता. जाणून घ्या घसा खवखवण्याचे कारण आणि ते लवकर कसे बरे करावे.
घसा खवखवणे व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होऊ शकते. याशिवाय प्रदूषण, धुम्रपान आणि हंगामी किंवा खाद्यपदार्थांच्या एलर्जीमुळे सुद्धा घसा दुखू शकतो. घसा दुखणे सहसा सर्दी किंवा नाक वाहत असेल तर त्यासोबत होते. परंतु काही वेळा हे श्वसन मार्गाच्या संसर्गासारख्या काही समस्यांचे लक्षण देखील असू शकते. याला लवकर बरे करण्यासाठी काही घरगुती पद्धतींचा अवलंब करता येतो.
घसादुखीचा सामना करण्यासाठी काढा हा सर्वोत्तम मार्ग आहे. हे करण्यासाठी पाणी गरम करून त्यात दालचिनीचा तुकडा टाका आणि नंतर त्यात तुळशीची काही पाने टाका. नंतर आले किसून पाण्यात टाका. आता ते चांगले उकळू द्या आणि जेव्हा पाणी अर्धे कमी होईल तेव्हा ते गाळून घ्या. आता हे घोट घोट करून प्या.
- सर्दीपासून आराम मिळवण्यासाठी स्टीम घेण्याचा प्रयत्न करा.
- स्वतःला हायड्रेटेड ठेवा. शक्य तितके लिक्विड पदार्थांचे सेवन करा. असे केल्याने तुमचा घसा ओलसर राहील ज्यामुळे अन्न गिळणे सोपे होईल.
- गरम सूप आणि मऊ भाज्या खाव्यात. कारण ते गिळण्यास सोपे जाते.
- घसा शांत करण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी कोमट पाणी, कोमट लिंबू पाणी किंवा हर्बल टी यासारखे लिव्हिड गोष्टी घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)