Best Time and Way to Eat Oranges: हिवाळ्यात संत्री भरपूर प्रमाणात मिळतात. गोड रसाळ संत्र्याची चव सर्वांनाच आवडते. हिवाळ्यात लोक हे फळ भरपूर खातात. मात्र कधी कधी ते चुकीच्या वेळी खाल्ल्याने घसादुखीसारख्या तक्रारी उद्भवतात. आजकाल लोक नाश्त्याच्या वेळी संत्र्याचा रस पितात, जे दिवसाच्या हेल्दी सुरुवातीसाठी चांगले आहे. मात्र ज्यूस पिण्यापेक्षा संत्री खाणे अधिक फायदेशीर असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. पण हिवाळ्यात संत्री खाण्याची योग्य वेळ आणि किती प्रमाणात खावी हे फार कमी लोकांना माहीत असते. संत्री खाण्याची योग्य वेळ, पद्धत आणि एका दिवसात किती संत्री खावी याबाबत येथे जाणून घ्या.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन आणि विविध फ्लेव्होनॉइड्स यांसारख्या अँटिऑक्सिडंट्स असतात. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातील पेशींना हानिकारक फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यास मदत करतात. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जास्त वेळ पोट भरलेले राहण्यासाठी हे खाणे फायदेशीर ठरते. संत्री डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने डोळे निरोगी राहतात.
एक व्यक्ती एका दिवसात किती संत्री खाऊ शकते हे वय, आरोग्य, अॅक्टिव्हिटीची लेव्हल यासारख्या वैयक्तिक घटकांवर अवलंबून असते. संत्री हे पौष्टिक फळ आहेत, पण ते संतुलित प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे. अहवालांनुसार दररोज २-३ संत्री खाल्ल्याने भरपूर फायबर आणि व्हिटॅमिन सी मिळू शकते.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते सकाळी आणि रात्री संत्र्याचा रस किंवा फळाचे सेवन करू नये. त्याऐवजी दुपारी हे फळ खा किंवा त्याचे ज्यूस प्या.
संत्री हे एक आंबट फळ आहे. त्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आढळते. जेव्हा पण तुम्हाला संत्री खायची असेल तेव्हा तुम्ही खाण्याच्या मध्ये अंतर ठेवा. यासोबत संत्री आणि गाजर यांचे मिश्रण टाळावे. यामुळे छातीत जळजळ होऊ शकते. तसेच संत्री खाल्ल्यानंतर दूध आणि दही खाणे टाळावे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)