Beat the Cold Wave: थंडीमुळे आजारी पडायचे नसेल तर फॉलो करा या टिप्स, पाहा कोणत्या गोष्टींची घ्यावी काळजी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Beat the Cold Wave: थंडीमुळे आजारी पडायचे नसेल तर फॉलो करा या टिप्स, पाहा कोणत्या गोष्टींची घ्यावी काळजी

Beat the Cold Wave: थंडीमुळे आजारी पडायचे नसेल तर फॉलो करा या टिप्स, पाहा कोणत्या गोष्टींची घ्यावी काळजी

Jan 13, 2024 02:23 PM IST

Winter Health Care Tips: थंडीत केलेला थोडीसा निष्काळजीपणा धोकादायक ठरू शकतो. या काळात आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. आजारी पडण्यापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे हे जाणून घ्या.

हिवाळ्यात स्वतःची काळजी घेण्यासाठी टिप्स
हिवाळ्यात स्वतःची काळजी घेण्यासाठी टिप्स (Freepik)

Tips to Stay Safe During Winter Season: हिवाळा सुरू होताच आरोग्यासोबतच त्वचेची आणि केसांचीही विशेष काळजी घ्यावी लागते. हिवाळ्यात थंड वाऱ्यामुळे व्यक्ती सहज आजारी पडतात. यामुळेच हवामानात बदल होताच निरोगी राहण्यासाठी प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्याचा सल्ला दिला जातो. खरं तर कडाक्याच्या थंडीमुळे एखाद्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमकुवत होण्यासोबत त्याला उच्च रक्तदाब, दमा आणि सीओपीडी सारख्या श्वसनाच्या समस्यांचा त्रास होऊ लागतो. याशिवाय जास्त थंडीमुळे सांधेदुखीच्या रुग्णांच्या समस्याही वाढतात. यासोबतच त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो. थंडीत थोडेसा निष्काळजीपणाही धोकादायक ठरू शकतो. अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगणे आणि आजारी पडण्यापासून स्वतःचे संरक्षण करणे आवश्यक असते. कसे ते जाणून घ्या.

थंडीपासून वाचण्यासाठी करा हे उपाय

लोकरीचे कापड

हिवाळ्यात आपले शरीर उबदार ठेवण्यासाठी आणि थंडीपासून बचाव करण्यासाठी चांगले लोकरीचे कपडे घाला. तुम्ही प्रवास करत असाल तर तुमच्यासोबत वूलन कॅपसह अतिरिक्त जाकीट, श्रग किंवा कार्डिगन ठेवा. थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कधीही आवश्यकतेपेक्षा जास्त लोकरीचे कपडे घालू नका. असे केल्याने शरीरातील रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो.

थरांमध्ये कपडे घाला

थंडीपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी हिवाळ्यात लेअरमध्ये कपडे घालणे चांगले असते. यासाठी सर्वप्रथम त्वचेला घामापासून दूर ठेवण्यासाठी ओलावा शोषणारे कपडे परिधान करून सुरुवात करा. यानंतर शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी बॉडी वॉर्मरसारखे चांगले इन्सुलेशन कपडे घाला. तसेच मोजे आणि हातमोजे घाला.

ऊन पडल्यावर घराबाहेर फिरा

दमा किंवा श्वासोच्छवासाच्या आजारांनी त्रस्त असलेल्यांनी बाहेर फिरायला सकाळी न जाता हलके ऊन पडल्यावर जावे. सकाळच्या थंड हवेमुळे श्वसनमार्गात समस्या वाढू शकतात. ज्यामुळे हृदयरोग्यांच्या समस्या वाढू शकतात. सकाळी ८ ते १० या वेळेत सूर्यप्रकाश घेतल्याने व्हिटॅमिन डीचा पुरवठा होतो.

हर्बल गोष्टी वापरा

खोकला, सर्दी आणि ताप यासारख्या समस्या असल्यास तुम्ही आले, तुळस, हळद आणि काळी मिरी यांसारख्या हर्बल घटकांपासून बनवलेला काढा पिऊ शकता. याशिवाय कोमट पाणी प्यावे. तसेच शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी हंगामी फळांचा रस (संत्री, पेरू, पपई, चिकू) आणि भाज्यांचे सूप (पालक, बीटरूट, आवळा, गाजर) प्यावे.

 

चेहरा झाकून ठेवा

नाक आणि तोंड झाकण्यासाठी स्कार्फ किंवा फेस मास्क वापरा. असे केल्याने केवळ हवेतील संसर्गापासूनच नव्हे तर थंड वाऱ्यापासूनही तुमचे संरक्षण होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner