Styling Tips for Winter Wedding: हिवाळा म्हटलं की लग्नाचा सीझन. एकीकडे लग्नांच्या विविध कार्यक्रमांमध्ये सुंदर दिसायचे असते तर दुसरीकडे कडाक्याच्या थंडीपासून संरक्षणही करायचे असते. कधी कधी महिलांना फॅशन स्टाईल महागात पडते. तसं तर लग्नांमध्ये महिला स्टाईलसाठी शाल आणि स्वेटर घालणे टाळतात. अशा परिस्थितीत थंड वारे तुम्हाला आजारी पाडू शकतात. लग्नामध्ये स्टाइलिंगसोबतच थंडीपासून दूर राहणे सुद्धा खूप गरजेचे आहे. अशा परिस्थितीत लग्न समारंभात थंडीपासून सुरक्षित राहण्यासाठी आणि स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही या फॅशन टिप्स फॉलो करू शकता. स्टाइल करताना या काही गोष्टींची काळजी घ्या.
स्टायलिश दिसण्यासाठी आणि लग्नामध्ये उबदार राहण्यासाठी तुम्ही तुमच्या आउटफिटच्या फॅब्रिककडे लक्ष दिले पाहिजे. हिवाळ्यासाठी वेलवेटचे कापड सर्वोत्तम मानले जाते. अशा परिस्थितीत तुम्ही या फॅब्रिकमध्ये बनवलेला ब्लाउज किंवा सूट घेऊ शकता. चांगले वेलवेट घेतले तर त्याची साडीही खूप छान दिसते.
थंडीपासून वाचण्यासाठी पायांना कव्हर करणे महत्त्वाचे आहे. आजकाल लेहेंग्यासह स्नीकर्स घालणे ट्रेंडमध्ये आहे. अशा परिस्थितीत थंडीपासून बचाव करण्यासाठी आणि स्टायलिश दिसण्यासाठी तुम्ही तुमच्या लेहेंग्याला मॅचिंग स्नीकर्स खरेदी करू शकता. साडी किंवा लेहेंगाच्या खाली शायनिंग स्नीकर्स घालता येतात.
एथनिक जॅकेट देखील खूप ट्रेंडमध्ये आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी तुम्ही या प्रकारचे जॅकेट कॅरी करू शकता. हे लांब किंवा लहान पॅटर्नमध्ये असू शकते. हे साडीसोबत घातल्यास खूप स्टायलिश दिसते.
जर तुम्ही सूट, साडी किंवा लेहेंगा घातला असेल तर तुम्ही थर्मल कॅरी करू शकता. थंडीपासून वाचवण्यासाठी हे बेस्ट आहे. हे वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये येते. तुम्ही तुमच्या ब्लाउज आणि नेक डिझाइननुसार ते निवडू शकता. हे सर्व प्रकारच्या आउटफिटसोबत कॅरी करता येते. त्यामुळे तुमच्या आउटफिटनुसार थर्मल घालता येतो.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या