मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dry Skin Care: चेहरा धुतल्यानंतर त्वचा कोरडी होते? लावा हा फेस पॅक

Dry Skin Care: चेहरा धुतल्यानंतर त्वचा कोरडी होते? लावा हा फेस पॅक

Hiral Shriram Gawande HT Marathi
Nov 21, 2023 11:13 AM IST

Winter Skin Care Tips: हिवाळ्याच्या आगमनाबरोबर थंड वाऱ्यामुळे त्वचा कोरडी होते. अशा परिस्थितीत चेहरा धुतल्यानंतर स्किन ड्राय होऊ लागते. या होममेड फेस पॅकने तुम्ही कोरड्या त्वचेपासून मुक्ती मिळवू शकता.

हिवाळ्यासाठी फेस पॅक
हिवाळ्यासाठी फेस पॅक

Homemade Face Pack for Dry Skin in Winter: हिवाळ्यात थंड वाऱ्यामुळे त्वचा पूर्णपणे कोरडी होते. त्यामुळे चेहऱ्याची आणि हात-पायांच्या त्वचेची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अनेक वेळा फेसवॉशने चेहरा धुतल्यानंतर त्वचा टाइट आणि कोरडी होऊ लागते. अशा परिस्थितीत घरगुती फेस पॅक त्वचेला कोरडे होण्यापासून प्रतिबंधित करते आणि ती मऊ आणि गुळगुळीत बनवते. चला तर मग जाणून घेऊया कोणते फेस पॅक त्वचेला नैसर्गिकरित्या ऑइली आणि मॉइश्चरायझिंग करण्यात मदत करतात.

ट्रेंडिंग न्यूज

मध महत्वाचे आहे

जर तुम्हाला हिवाळ्यात तुमची त्वचा कोरडी होण्यापासून वाचवायची असेल तर त्वचेवर मध अवश्य लावा. वेगवेगळ्या फेसपॅकमध्ये मध मिसळून लावल्याने त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळतो आणि त्वचा चमकदार होते.

हनी बनाना फेस पॅक

त्वचा मऊ आणि गुळगुळीत करण्यासाठी पिकलेली केळी मॅश करा. त्यात काही थेंब मध मिसळून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. विशेषतः हिवाळ्यासाठी हा सर्वोत्तम फेस पॅक आहे.

कच्चे दूध आणि मध

एक चमचा कच्च्या दुधात चिमूटभर हळद आणि मध मिसळा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला नैसर्गिक चमक येण्यास मदत होते आणि त्वचेची मोठी छिद्रेही कमी होतात. तसेच त्वचा मऊ आणि गुळगुळीत होते. हिवाळ्यात आठवड्यातून तीन ते चार वेळा हा फेसपॅक लावता येतो.

 

बेसन स्क्रब

जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर चमक सोबत मॉइश्चर हवा असेल तर एक चमचा बेसनामध्ये मध मिसळा आणि हा पॅक चेहऱ्यावर लावा. थोडा सुकल्यानंतर हा फेसपॅक हलक्या हातांनी मसाज करून काढून टाका. डेड स्किन काढण्यासोबतच ते त्वचेला मॉइश्चराइझ देखील करेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग