International Carrot Day History and Significance: दरवर्षी ४ एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक गाजर दिवस म्हणून साजरा केला जातो. गाजर दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना गाजर खाण्याचे फायदे जाणून घेणे हा आहे. हा दिवस २००३ मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली. गाजर त्यांच्या पौष्टिक मूल्य आणि अष्टपैलू गुणासाठी महत्त्वाचे आहे. हा दिवस आपल्याला गाजरबद्दल माहिती पसरवण्याची आणि त्याच्या स्वादिष्ट पदार्थांचा आनंद घेण्याची संधी देतो. आंतरराष्ट्रीय गाजर दिवस साजरा करण्यामागील इतिहास आणि महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.
गाजराचे वनस्पति नाव डॉकस कॅरोटा आहे. आशियातील लोकांनी गाजराची लागवड प्रथम सुरू केली आणि तेथून ते जगातील इतर देशांमध्ये पोहोचले, असे तज्ज्ञांचे मत आहे. गाजर चार वेगवेगळ्या रंगात आढळतात: लाल, पिवळा, केशरी आणि काळा. आंतरराष्ट्रीय गाजर दिवसाची स्थापना २००३ साली झाली. त्यानंतर २०१२ पर्यंत ते जगभरातील सर्व ठिकाणी पसरले जेथे लोकांना गाजरबद्दल माहिती होती. गाजर दिवस साजरा करण्याची सुरुवात सर्वप्रथम फ्रान्स आणि स्वीडनमध्ये झाली. त्यानंतर भारत, जपान, रशिया आणि इटलीसह जगातील अनेक देशांमध्ये जागतिक गाजर दिन साजरा केला जाऊ लागला. गाजर दिन साजरा करण्यामागचा उद्देश गाजरासारख्या पौष्टिक पदार्थांबाबत देशातील लोकांमध्ये जागरुकता वाढवणे हा होता.
आंतरराष्ट्रीय गाजर दिन साजरा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे या पौष्टिकतायुक्त भाजीचे जास्तीत जास्त सेवन करणे हे आहे. गाजराचे वैशिष्ट्य असे आहे की आपण याचा वापर बहुतेक भाज्या, पदार्थ बनवताना करु शकतो. दुपारच्या जेवणासाठी बनवलेली मिक्स भाजी असो किंवा रात्रीच्या जेवणानंतर डेझर्टमध्ये दिलेला हलवा असो, गाजर कोणत्याही स्वरूपात आवडीने खाऊ शकतो. अनेकांना गाजर सलाद मध्ये खायला आवडते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)