Health Benefits of Rock Sugar or Mishri: खडीसाखर चवीला गोड असली तरी ती साखरे इतकी हानिकारक नसते. खडीसाखर अनेकदा बडीशेपसोबत मिसळून खाल्ली जाते. प्रसादातही खडीसाखर अर्पण करण्याची पद्धत आहे. पण तुम्हाला माहित आहेका की खडीसाखर म्हणजेच रॉक शुगर खाण्याचे अनेक फायदे आहेत. आयुर्वेदात खडीसाखरेचे फायदेशीर गुणधर्म सांगितले आहेत. खडीसाखर थेट खाण्याव्यतिरिक्त अनेक गोष्टींमध्ये मिसळूनही खाल्ली जाते. त्यामुळे त्याचे फायदे दुप्पट होतात. आयुर्वेदानुसार या गोष्टींमध्ये खडीसाखर मिसळून खाणे शरीरासाठी फायदेशीर आहे.
आयुर्वेदात खडीसाखर सोबत काही गोष्टी मिसळून खाल्ल्याने शरीरातील समस्या आणि रोगांशी लढण्यास मदत होते, असे सांगितले आहे. कोरडे आले म्हणजेच सुंठ मिसळून खडीसाखर खाण्याचे अनेक फायदे आहेत.
- रोगप्रतिकार शक्ती वाढते
- भूक न लागण्याची समस्या दूर होते
- पचनशक्ती मजबूत होते
- सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो
- खोकला आणि कफ यापासून आराम मिळतो.
जर तुम्ही केस गळण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर आवळा पावडर आणि देशी तूप खडीसाखर सोबत सम प्रमाणात मिसळून खाल्ल्याने केसांच्या सर्व समस्यांपासून आराम मिळतो.
त्रिफळा चूर्णला आयुर्वेदात अतिशय प्रभावी औषध म्हणून वर्णन केले आहे. हे खाल्ल्याने शरीराच्या अनेक समस्यांपासून आराम मिळतो. त्रिफळा चूर्ण, खडीसाखर आणि देशी तूप समप्रमाणात मिसळून सेवन केल्यास कमजोर दृष्टी चांगली होते.
बडीशेप आणि खडीसाखर एकत्र कशी खायची हे जवळजवळ प्रत्येकालाच माहीत आहे. या दोघांचे मिश्रण खाल्ल्याने अन्न पचण्यास सोपे जाते.
- खडीसाखर खाल्ल्याने थकवा दूर होतो.
- खडीसाखरमुळे पुरुषांच्या शुक्राणूंची गुणवत्ताही सुधारते.
- उलटी आणि मळमळ होत असल्यास खडीसाखर चघळल्याने फायदा होतो.
- खडीसाखर खाल्ल्याने घसादुखीच्या समस्येपासून आराम मिळतो.
- आयुर्वेदात खडीसाखर वात दोष दूर करते असे सांगितले आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)