New Year Resolution : संकल्प करण्यासाठी नव्हे, संकल्प पूर्तीसाठी फॉलो करा 'या' टिप्स-why new year resolution fails know tips to keep new years resolution ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  New Year Resolution : संकल्प करण्यासाठी नव्हे, संकल्प पूर्तीसाठी फॉलो करा 'या' टिप्स

New Year Resolution : संकल्प करण्यासाठी नव्हे, संकल्प पूर्तीसाठी फॉलो करा 'या' टिप्स

Jan 01, 2024 01:28 PM IST

New Year 2024: नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत करतानाच अनेक लोक विविध संकल्प करतात. पण हे संकल्प काही दिवसच ते पाळू शकतात. असे का होते आणि संकल्पावर टिकून राहण्यासाठी काय करावे जाणून घ्या.

नवीन वर्षाचे संकल्प पूर्ण करण्यासाठी टिप्स
नवीन वर्षाचे संकल्प पूर्ण करण्यासाठी टिप्स (unsplash)

Tips To Keep New Year's Resolution: बहुतांश लोक नवीन वर्षात आपले आयुष्य आणखी चांगले करण्यासाठी उत्साहाने काही संकल्प करतात. पण काही काळानंतर नवीन वर्षाच्या संकल्पांचा उत्साह थंडावू लागतो आणि त्या व्यक्तीने स्वतःला दिलेली वचने भंग पावू लागतात. तुमच्याही बाबतीत असेच काही घडते का? जर उत्तर होय असेल, तर काळजी करू नका. असे करणारे तुम्ही एकमेव नाही. स्क्रॅंटन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की २३ टक्के लोक नवीन वर्षाच्या दोन आठवड्यांनंतर त्यांचे संकल्प सोडतात. तर केवळ १९ टक्के लोक त्यांच्या संकल्पावर दीर्घकाळ टिकून राहतात. अशा परिस्थितीत जे लोक आपले संकल्पावर टिकून राहतात आणि जे लोक संकल्प मध्येच सोडून देतात या दोन लोकांमध्ये काय फरक आहे हे जाणून घ्या. शिवाय संकल्पावर टिकून राहण्यासाठी काय करावे हे पाहा.

नवीन वर्षाच्या संकल्पांवर टिकून राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स

कठीण ध्येय सेट करु नका

बहुतेक लोक नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी उत्साहाच्या भरात स्वतःसाठी अशी काही उद्दिष्टे ठेवण्यास सुरुवात करतात जी साध्य करण्याची शक्यता फारशी नसते किंवा ते आवश्यकतेपेक्षा जास्त कठीण असतात. असे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भरपूर ऊर्जा आणि वेळ तर लागतोच. शिवाय लोक लवकर कंटाळू लागतात. अशा परिस्थितीत सुरुवातीस नेहमी स्वतःसाठी लहान ध्येये ठेवा. जे पूर्ण केल्यावर तुमचा उत्साह वाढेल आणि तुम्ही मोठी उद्दिष्टे सहज साध्य करू शकाल.

आपल्या कामाचा आढावा न घेतल्यास

आठवड्यातून एकदा तुमच्या कामाचे पुनरावलोकन, समिक्षा केल्याने तुम्हाला प्रगती होण्यास मदत होऊ शकते. तसेच निमित्तांचे संधींमध्ये रूपांतर देखील होऊ शकते. हे करून तुम्ही चांगल्या ट्रॅकिंग सिस्टमच्या मदतीने तुमच्या चुका सुधारू शकता. स्वतःच्या गृहीतके, अंदाज, निर्णय आणि अतिविचार यांमुळे बहुतेक अडचणी उद्भवतात. तुमच्या यशाचा ट्रॅक रेकॉर्ड ठेवल्याने तुमच्या संकल्पांना स्थिरता मिळते. ज्यामुळे ते पूर्ण करणे सोपे होते.

स्वतःवर शंका घेणे

तुमच्या भूतकाळातील अपयशांचा विचार करुन तुमचे भविष्य ठरवू नका. असे केल्याने तुमचा नवीन वर्षाचा संकल्प कधीही पूर्ण होणार नाही. लक्षात ठेवा तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्या अपयशातून मिळालेल्या अनुभवांचा वापर करा.

प्लॅनिंगचा अभाव

बहुतेक लोकांची उद्दिष्टे साध्य होत नाहीत कारण ती पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे चांगले नियोजन नसते. कोणतेही कार्य पूर्ण करण्यासाठी नेहमीच उत्कृष्ट नियोजन आवश्यक असते. तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी चांगले नियोजन करा. प्रत्येक कामाची छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये विभागणी करा आणि ते निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

 

सध्याच्या रूटीनमध्ये बदल न करणे

तुमचा नवीन वर्षाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आधी तुमच्या सवयींमध्ये काही बदल करण्याचा प्रयत्न करा. जे हे करत नाहीत ते आपले ध्येय साध्य करण्यासाठी धडपडत राहतात. उदाहरणार्थ जर तुम्ही मॅरेथॉन धावण्याचा संकल्प केला असेल तर आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा जॉगिंग करून सुरुवात करा. हळूहळू जास्त धावण्यापर्यंत काम करा आणि आठवड्यातून अधिक दिवस व्यायाम करा. नवीन ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला सध्याच्या रूटीनमध्ये बदल करावा लागेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग