Why is Perfume Day celebrated: अँटी व्हॅलेंटाइन वीक सुरु झाला आहे. दरवर्षी व्हॅलेंटाईन डेनंतरचा आठवडा अँटी व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन वीकदरम्यान सगळं प्रेमाचं पाहिल्यानंतर अँटी व्हॅलेंटाईन वीक साजरा करून सिंगल्स स्वतःला डिटॉक्स करतात. अँटी व्हॅलेंटाईन वीकमध्ये स्लॅप डे, किक डे, परफ्यूम डे, फ्लर्ट डे, कन्फेशन डे, मिसिंग डे आणि ब्रेकअप डे यांचा समावेश आहे. विषारी नात्यांमधून बाहेर आलेले लोक स्वतःचा आनंद साजरा करतात. अँटी-व्हॅलेंटाईन वीकच्या दिवसांचा अर्थ असा नाही की आपण आपल्या एक्सला मारतो किंवा अन्य प्रकारे नाकारतो तर याचा अर्थ असा आहे की आपण सर्व प्रकारची नकारात्मकता काढून टाकली पाहिजे आणि चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे.
अँटी व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस परफ्यूम डे म्हणून साजरा केला जातो. हा खास दिवस साजरा करण्याची तयारी करत असताना, परफ्यूम डेबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्या. दरवर्षी १७ फेब्रुवारी ला परफ्यूम डे साजरा केला जातो. यावर्षी हा खास दिवस शनिवारी आहे.
परफ्यूम डेचा इतिहास माहित नाही, पण, या दिवशी लोक आपल्या आवडत्या परफ्यूमने स्वत: चे लाड करतात. परफ्यूम आणि सुगंध बऱ्याच आनंदी आणि दुःखी आठवणींना चालना देऊ शकतात. अँटी व्हॅलेंटाईन वीक म्हणजे स्वत:चे लाड करणे आणि आपल्या स्वतःचा परफ्यूम शोधणे.
व्हॅलेंटाईन वीकमध्ये जोडपे ज्या प्रकारे त्यांचे प्रेम त्यांच्या जोडीदारांना व्यक्त करतात. त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी ते व्हॅलेंटाईन वीकच्या सातही दिवशी संदेश आणि भेटवस्तू देतात. त्याचप्रमाणे प्रेमात फसवणूक झालेले लोक त्यांच्या जोडीदाराप्रती त्यांची निष्ठा आणि राग व्यक्त करण्यासाठी अँटी व्हॅलेंटाईन वीक साजरा करतात. ज्यामध्ये अँटी व्हॅलेंटाईन वीकच्या तिसऱ्या दिवशी परफ्यूम डे साजरा केला जातो.
हा दिवस साजरा करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे परफ्यूम विकत घेणे आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे परफ्यूम शोधणे. आपण आपल्या आवडत्या व्यक्तींबरोबर परफ्यूम विकत घेयला जाऊ शकतो किंवा एकमेकांना परफ्यूम गिफ्ट करू शकतो. यासोबत आजच्या दिवसासाठी आपला सुगंध समोरच्याला देऊ शकतो. सुगंधी फुलांनी आणि सुगंधाने खोली सजवल्यास आपल्याला ताजेतवाने वाटण्यास मदत होते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)
संबंधित बातम्या