Why do we celebrate National Voters Day on January 25: भारतातील निवडणूक फार चर्चेत असतात. कोणत्या ना कोणत्या राज्यात विधानसभा निवडणुका होत असतात. त्याशिवाय दर पाच वर्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारीही केली जाते. यंदा येत्या काही महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी भारताच्या निवडणूक आयोगावर असते. देशभरातील लोकांना मतदानाबाबत जागरुकता केली जाते. २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनही साजरा केला जाणार आहे. या दिवशी देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आणि लोकांना मतदानासाठी प्रवृत्त केले जाते. आपण तुम्ही कधी विचार केला आहे का की दरवर्षी २५ जानेवारीलाच राष्ट्रीय मतदार दिवस का साजरा केला जातो.
भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी झाली. याचनंतर २६ जानेवारी रोजी देशात संविधान लागू झाले. आधी हा दिवस फक्त ;लक्षात ठेवला जात होता पण २०११ पासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी २५ जानेवारी २०११ रोजी पहिल्यांदा राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला. तेव्हापासून, राष्ट्रीय मतदार दिवस दरवर्षी २५ जानेवारी रोजी देशभरात साजरा केला जातो.
या राष्ट्रीय मतदार दिनाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये निवडणूक जागृती निर्माण करणे आणि त्यांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे.
राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध शिबिरांचे आयोजन केले जाते. नवीन मतदारांना त्यांचे मतदार कार्ड दिले जाते. तरुणांसाठी अनेक ठिकाणी सेल्फी पॉइंटही उभारण्यात आले आहेत. भारत १४ वा राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने सर्व राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये तयारी केली आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)
संबंधित बातम्या