मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mental Health: संपूर्ण आरोग्यासाठी मानसिक आरोग्य महत्त्वाचे का आहे? जाणून घ्या

Mental Health: संपूर्ण आरोग्यासाठी मानसिक आरोग्य महत्त्वाचे का आहे? जाणून घ्या

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jan 18, 2024 10:01 PM IST

Effects of Mental Health: मानसिक आजार हे जागतिक स्तरावर आणि भारतात आपल्यासमोर असलेले सर्वात महत्त्वाचे आरोग्य आव्हान आहे. काही आकडेवारी वरून हे स्पष्ट होते आत्महत्या हे आपल्या देशातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.

Tips To Improve Mental Health
Tips To Improve Mental Health (freepik )

Effects of mental health on physical health: आपण अशा समाजात राहतो जिथे अधिक महत्त्वाकांक्षा आणि आकांक्षा ह्या अधिक लक्षणीय निराशेला कारणीभूत ठरतात, ह्या पर्यायाने एकाकीपणा, वियोग आणि तणाव वाढवतात. आणि हे सर्व घटक मानसिक आजार वाढवतात. तणाव, चिंता आणि नैराश्यासारख्या मानसिक आरोग्याच्या चिंता मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग यासारख्या शारीरिक स्थितींचा धोका वाढवतात. याबद्दल अधिक जाणून घेऊयात लिव्हलव्हलॉफचे तज्ज्ञ आणि अध्यक्ष, मानसोपचार डॉ श्याम भट यांच्याकडून.

भारतात मानसिक आजाराचे प्रमाण वाढले आहे. २०१७ मध्ये १९७.३ दशलक्ष प्रभावित होते. यात ४५.७ दशलक्ष नैराश्याने आणि ४४.९ दशलक्ष चिंतेने ग्रस्त होते. ५०% शहरी भारतीयांवर तणावाचा परिणाम होतो. मानसिक आरोग्य समस्येला स्वीकारणं आणि त्यावर चर्चा करण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात अनेकदा अंधश्रद्धेतून मानसिक आरोग्याकडे पाहिले जाते. यामुळे हवी ते मदत घेतली जात नाही. आपण समाजाला मानसिक आरोग्यासाठी समर्थन मिळविण्यासाठी प्रोत्साहित करण्याची गरज आहे. मानसिकदृष्ट्या जे चालले आहे ते हाताळणे आव्हानात्मक असू शकते. पण मानसिक आरोग्य सांभाळणे फारच गरजेचे आहे.

जेव्हा तुमच्या शरीराचा एखादा भाग दुखत असेल किंवा नीट काम करत नसेल, तेव्हा डॉक्टर आपण जातो. हे सामाज्यात सहज स्वीकारले जाते. पण जेव्हा एखाद्या व्यक्तीचे मन बरे नसते तेव्हा काहीतरी चुकीचे आहे हे समाज समजून घेत नाही. अनेकांना मदत घेण्यासाठी जायला लाज वाटते. अशावेळी मानसिक आरोग्याच्या चिंतेची अनेक लक्षणे मानवी भावनांच्या नेहमीच्या चढ-उतारांशी ओव्हरलॅप होतात. एखाद्या व्यक्तीला हे समजणे कठिण होऊन बसते की त्याला प्रोफेशनल मदतीची किती गरज आहे.

काय गरजेचे आहे?

मानसिक आरोग्याशिवाय शाररिक आरोग्य नाही हे स्पष्ट असल्याने आपण मानसिक आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे. प्रत्येकाने मानसिक आरोग्याला चालना देणार्‍या आणि तणाव, चिंता आणि नैराश्य टाळणार्‍या चांगल्या जीवनशैलीच्या सवयी लावल्या पाहिजेत. यामध्ये चांगली झोप, संतुलित पोषण, नियमित व्यायाम, चांगले सोशल नेटवर्क्स आणि योग आणि ध्यान यासारख्या शिक्षण पद्धतींचा समावेश होतो. वेगाने बदलणाऱ्या, तणावपूर्ण जगात मानसिक आरोग्यासाठी दररोज वेळ काढणे आवश्यक आहे.

स्वतः आनंदी, निरोगी आणि शांततेत असण्यामुळे आपली क्षमता वाढवणारे जीवन जगण्याच्या आपल्या क्षमतेवर लक्षणीय परिणाम होतो. चांगल्या आरोग्याचा संबंध थेट मानसिकदृष्ट्या निरोगी असण्याशी आहे. याबद्दल अद्याप पुरेसा भर दिला गेला नाही. याचे कारण आज आपण ज्या जगात राहतो ते आनंदाच्या दृष्टिकोनातून नव्हे तर उत्पादकतेच्या दृष्टीकोनातून प्रत्येक गोष्टीकडे बघते. आपले मानसिक आरोग्य आणि जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी आपण बरेच काही करू शकतो. या वर्षी आपल्या मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे याचे वचन घेऊयात.

लिव्ह लव्ह लॉफ फाउंडेशन

लिव्ह लव्ह लॉफ फाउंडेशन (LiveLoveLaugh) ही दीपिका पदुकोणने २०१५ मध्ये स्थापन केलेली धर्मादाय ट्रस्ट आहे. तणाव, चिंता आणि नैराश्य अनुभवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आशा देणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे. लिव्ह लव्ह लॉफ जागरूकता निर्माण करण्यावर आणि मानसिक आरोग्य सेवांची सुलभता आणि परवडण्यामध्ये सुधारणा करण्यावर केंद्रित आहेत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

WhatsApp channel