International Friendship Day History and Significance: जगातील सर्वात आवडत्या नात्यांपैकी एक म्हणजे मैत्री. हे एक रंजक नाते आहे जिथे ते रक्ताच्या नात्यावर आधारित नसते तर केवळ प्रॉमिस आणि समजूतदारपणावर आधारित असते. काहीही झालं तरी आपल्या मित्र-मैत्रिणी आपल्या पाठीशी आहेतच ही भावना असते. जेव्हा आपल्याला आपल्या विजयाचा आनंद साजरा करायचा असतो तेव्हा आपण त्यांच्याकडे जातो किंवा जेव्हा टेन्शन किंवा दुःख असते तेव्हा रडण्यासाठी सुद्धा यांचाच खांदा असतो. खरं तर ते आपल्याला जीवनात पावलोपावली मार्गदर्शन करत असतात आणि प्रत्येक समस्यांमध्ये मदत करतात. मैत्री हे एक सुंदर नाते आहे आणि आपला खरा मित्र कोण आहे हे जाणून घेताना वय, रंग आणि जातीचे कोणतेही बंधन नसते.
आपले जिवलग मित्र, आपल्यातील अर्थपूर्ण मैत्री आणि योग्य मित्रांनी आपला हात धरला तर आपण आयुष्यात कोणत्याही गोष्टीतून कसे जाऊ शकतो याचा आदर करण्यासाठी दरवर्षी आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा केला जातो. हा खास दिवस साजरा करताना या दिवसाचा इतिहास, महत्त्व जाणून घ्या.
दरवर्षी ३० जुलै रोजी आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा केला जातो. २०११ पासून, हा विशेष दिवस साजरा केला जातो, ज्यात लोक आपल्या मित्रांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.
२०११ मध्ये, संयुक्त राष्ट्र महासभेने आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस संस्कृती, समुदाय, देश आणि लोकांमधील मैत्री, संबंध साजरे करण्याचा दिवस म्हणून घोषित केला. तरुणाई हे देशाचे भवितव्य असून विविधतेचा आदर करणे आणि प्रत्येक गोष्टीत एकता शोधणे हे त्यांना शिकवण्याच्या महत्त्वावर हा दिवस भर देतो.
या दिवशी सरकारी संस्था, खाजगी संस्था आणि इतर संस्था विविध समुदाय आणि संस्कृतींमध् संवाद सुरु करण्यासाठी, ते एकत्र येण्यासाठी आणि आपापसातील एकता आत्मसात करण्यासाठी कार्यक्रम, चर्चासत्रे आणि उपक्रम आयोजित करतात. एकता, परस्पर सामंजस्य आणि सलोख्याच्या माध्यमातून या दिवशी विविधतेत एकता शोधली जाते.
"आंतरराष्ट्रीय मैत्री दिन हा युनेस्कोने शांततेच्या संस्कृतीची व्याख्या मूल्ये, दृष्टिकोन आणि वर्तनांचा संच म्हणून केला आहे, जो हिंसेला नाकारतो आणि समस्या सोडविण्याच्या दृष्टीकोनातून त्यांच्या मूळ कारणांकडे लक्ष देऊन संघर्ष रोखण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर १९९७ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने तो स्वीकारला, असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे.
संबंधित बातम्या