What precautions should be taken to prevent stroke: स्ट्रोक ही एक वैद्यकीय आणीबाणी आहे जी मेंदूला रक्त पुरवठ्यात अडथळा आणते. याला ब्रेन अटॅक असेही म्हणतात. हिवाळ्यात स्ट्रोकचे प्रमाण वाढते कारण जसजसा हिवाळा सुरू होतो आणि बाहेरचे तापमान थंड होते, तसतसे एखाद्याच्या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्यामुळे निर्जलीकरण होण्याची शक्यता असते त्यामुळे रक्तातील चिकटपणा आणि गुठळ्या होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अनेकांना स्ट्रोकचा त्रास होतो. एंडोव्हस्कुलर न्यूरोसर्जन डॉ. नीरज सिंग याबद्दल माहिती देताना म्हणाले की, शारीरिक हालचालींचा अभाव, प्रक्रिया केलेल्या अन्नाचा वापर, तणाव, लठ्ठपणा, उच्च कोलेस्ट्रॅाल आणि उच्च रक्तदाब यामुळे देखील स्ट्रोकची समस्या निर्माण होऊ शकते. ज्यामुळे रुग्णांमध्ये विकृती आणि मृत्यूचे प्रमाण वाढते.
स्ट्रोकशी संबंधित लक्षणे सहज ओळखता येतात. सांकेतिक भाषेत या लक्षणांचे वर्गीकरण हे बीफास्ट (BEFAST) असेही करता येते. याचा अर्थ (बॅलेन्स - संतुलन कमी होणे, आईज- दृष्टी धूसर होणे किंवा कमी होणे, फेस- चेहऱ्याचा काही भाग क्षीण होणे, आर्म- हात कमकुवत होणे, स्पीच- बोलण्यात अडचणी आणि टाईम- वेळ).
योग्य वेळी उपचार न केल्यास स्ट्रोकचे घातक परिणाम होऊ शकतात. अर्धांगवायू, संवाद साधताना अडचणी येणे, उदासीनता, चिंता, स्मरणशक्ती कमी होणे, डीप व्हेन थ्रोम्बोसिस (DVT), मूत्रमार्गात संक्रमण (UTIs), किंवा फेफरे यांमुळे कायमचे अपंगत्व येऊ शकते. स्ट्रोकच्या रुग्णाला ताबडतोब उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात नेले पाहिजे जेणेकरून वेळीच उपचार सुरू होतील.
वेळेला महत्त्व असून एखाद्याला थ्रोम्बोलिसिस, क्लॉट-बस्टिंग मेडिसिन, मेकॅनिकल थ्रोम्बोक्टॉमी, सपोर्टीव्ह केअर आणि रिहॅबिलेशन सारख्या उपचारांचा पर्याय सुचविला जाईल. न्यूरोलॉजिस्ट स्ट्रोक व्यवस्थापनासाठी उपचार आखुन देतात. स्ट्रोकची समस्या टाळण्यासाठी आणि जीवनाचा दर्जा सुधारणे गरजेचे आहे.
हिवाळ्यात रक्तदाबावर लक्ष ठेवा आणि शरीर हायड्रेटेड राहिल याची खात्री करा. घरच्या घरी व्यायामाचा पर्याय निवडा, मानसिक आरोग्य चांगले राखा, डॉक्टरांच्या मदतीने आवश्यकतेनुसार औषधे घ्या. संतुलित आहाराचे सेवन करा. अशा गोष्टी करून पक्षाघात रोखणे ही काळाची गरज आहे.
संबंधित बातम्या