History and Interesting Facts of Republic Day: भारत दरवर्षी २६ जानेवारी ला आपला प्रजासत्ताक दिन साजरा करतो. यावर्षी देशातील नागरिक हा ७५ वा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करत आहेत. प्रजासत्ताक दिवस २६ जानेवारीला का साजरा केला जातो हे तुम्हाला माहीत आहे का? या दिवसाचे महत्त्व आणि काही मनोरंजक गोष्टी जाणून घ्या.
२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारल्या गेली. या दिवसाची आठवण म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. १९४७ मध्ये भारताला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले असले तरी २६ जानेवारी १९५० ला भारतीय राज्यघटना अंमलात आली आणि देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करून एक सार्वभौम राज्य बनला.
- संविधान सभेचे पहिले अधिवेशन ९ डिसेंबर १९४६ रोजी आणि शेवटचे अधिवेशन २६ नोव्हेंबर १९४९ रोजी झाले. त्यानंतर वर्षभरानंतर राज्यघटना स्वीकारण्यात आली.
- बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. या दिवशी भारतात संविधान दिनही साजरा केला जातो.
- प्रजासत्ताक दिन हा स्वतंत्र भारताच्या भावनेचे स्मरण करतो.
- १९३० मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने वसाहतवादी राजवटीतून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती.
- प्रजासत्ताक दिन भारतीय नागरिकांना लोकशाही पद्धतीने आपले सरकार निवडण्याच्या अधिकाराचे स्मरण करतो.
- भारतीय राज्यघटनेच्या स्थापनेच्या स्मरणार्थ हा दिवस राष्ट्रीय सुट्टी म्हणून साजरा केला जातो.
- प्रजासत्ताक दिनाचा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रपती ध्वजारोहण करतात आणि त्यानंतर भव्य लष्करी आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतात.
- भारताचे राष्ट्रपती देशातील पात्र नागरिकांना पद्म पुरस्कारांचे वितरण करतात आणि शूर सैनिकांना परमवीर चक्र, अशोक चक्र आणि वीर चक्र प्रदान करतात.
- दिल्लीतील राजपथवर होणारे प्रजासत्ताक दिन परेड म्हणजेच आरडी परेड हे नागरिकांसाठी विशेष आकर्षण असते.
- प्रजासत्ताक दिनाच्या परेडचे लाइव्ह वेबकास्टही दरवर्षी लाखो लोकांसाठी उपलब्ध करून दिले जाते.
संबंधित बातम्या