Interesting Facts About National Bird Day: पक्षी ही निसर्गातील सर्वात सुंदर गोष्टींपैकी एक आहे. त्यांच्या किलबिलाटाने आपला दिवस चांगला बनतो. तर आकाश उंच उडणारे किंवा थव्याने उडणारे पक्षी पाहून आपल्याला आनंद होतो. तर कधी कधी त्यांचे रंगबीरंगी पंख, छोटे पक्षी फक्त पाहायला आवडतात. पण यापलीकडे ते इकोसिस्टमचे महत्त्वाचे भाग आहेत, हे विसरून चालणार नाही. पक्षी निसर्गासाठी डॉक्टरांसारखे काम करतात. ते आपल्याला सांगतात की वातावरण आनंदी आणि निरोगी आहे. त्यामुळे आपण त्यांना मदत करणे आवश्यक आहे. त्यांची घरे सुरक्षित आणि स्वच्छ ठेवूया, जेणेकरून ते आपला किलबिलाट कायम ठेवू शकतील.
अनेक पक्ष्यांना आर्थिक लाभ आणि आनंदासाठी पकडले जाते, त्यांना पिंजऱ्यात बंदिस्त केले जाते, वाईट वागणूक दिली जाते, तसेच पैशासाठी विकले जाते. याबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय पक्षी दिन साजरा केला जातो. पक्षी किंवा प्राण्यांना पिंजऱ्यात अडकवून ठेवणे, कैद करणे बेकायदेशीर आणि नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. त्यांना चांगले जीवन मिळावे यासाठी आपण काम केले पाहिजे.
- दरवर्षी ५ जानेवारी हा राष्ट्रीय पक्षी दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी राष्ट्रीय पक्षी दिन शुक्रवारी आहे.
- २००२ पासून अमेरिकेत राष्ट्रीय पक्षी दिन साजरा केला जातो. ही तारीख निवडली गेली कारण हा वार्षिक ख्रिसमस बर्ड काऊंटचा दिवस देखील असतो.
- अमेरिकेत या दिवशी राष्ट्रीय सुट्टी साजरी केली जाते.
- लोक एकत्र येऊन अमेरिकेतील पक्ष्यांची गुणवत्ता आणि स्थितीबद्दल तपशील गोळा करतात.
- मानवनिर्मित समस्यांमुळे पक्ष्यांचे राहणीमान खूप खालावले आहे. जंगलतोडीपासून ते हवामान बदलापर्यंत, ग्लोबल वॉर्मिंगपासून अधिवास नष्ट होण्यापर्यंत पक्ष्यांना आपली घरे गमवावी लागली आहेत. त्यामुळे त्यांचे घर, राहणीमान गमावले आहे.
- ख्रिसमस बर्ड काउंट डे हा जगातील सर्वात मोठा नागरी विज्ञान प्रकल्प आहे, जो अमेरिकेतील वन्य पक्ष्यांची गणना करतो.
- हा राष्ट्रीय पक्षी दिन त्यांचे संरक्षण करून साजरा करा.
- पक्ष्यांना कैद करण्याबाबत जागरुकता वाढवा, पक्षी अभयारण्यांचे समर्थन करा आणि मजबूत कायद्यांचे समर्थन करा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या