Home Remedies for Hormonal Imbalance: आजकाल महिलांमध्ये हार्मोनल असंतुलनाची समस्या सातत्याने वाढत आहे. व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनात मानसिक आणि भावनिक कारणांमुळे शरीरातील हार्मोन्सच्या स्रावात निर्माण झालेल्या असमतोलामुळे ही समस्या उद्भवते. बहुतांश महिला या समस्येने त्रस्त आहेत. शरीरातील हार्मोन्स वाढ, पुनरुत्पादन, चयापचय, मूड आणि शरीराचे तापमान यासह अनेक महत्त्वपूर्ण शारीरिक कार्यांमध्ये हार्मोन्स महत्त्वाची भूमिका निभावतात. अशा वेळी जेव्हा हार्मोनल असंतुलन होते तेव्हा त्याचा परिणाम व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर होतो. जर तुम्ही सुद्धा हार्मोनल असंतुलनाच्या समस्येशी झगडत असाल तर न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही देशी घरगुती उपाय सांगितले आहे. किरणने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
वैद्यकीय भाषेत, हार्मोनल असंतुलन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात एक किंवा अधिक हार्मोन्स खूप कमी किंवा जास्त प्रमाणात तयार होऊ लागतात.
- झोपेत अडचण
- डोकेदुखी
- उष्णता आणि थंड याप्रती संवेदनशिलता
- कोरडी त्वचा
- त्वचेवर पुरळ किंवा पॅचेस
- हृदयाचे ठोके आणि रक्तदाबात बदल
- चिडचिडेपणा
- चिंता
- नैराश्य
- जास्त तहान लागणे किंवा वारंवार लघवीला जाणे
- कमकुवत हाडे
- नेहमी थकवा जाणवणे
- एक कप भोपळ्याच्या बिया
- एक कप फ्लेक्स सीड्स
- एक चमचा बडीशेप
- १-२ दालचिनीच्या काड्या
हार्मोनल असंतुलन दूर करण्यासाठी या सर्व गोष्टी ७ ते ८ मिनिटे कोरड्या भाजून बारीक करून घ्याव्यात. यानंतर दररोज ब्रेकफास्टच्या ३० मिनिटे आधी एक चमचा ही पावडर घ्यावी. पावडर गिळायची नाही तर नीट चावून घ्यायची आहे याची विशेष काळजी घ्या. ही पावडर तुम्ही महिनाभर साठवून ठेवू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)